राज्यस्तरीय ऊस परिषद माढ्यात 23 जुलैला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जुलै 2017

सोलापूर - महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघ व "आत्मा' सोलापूरच्या वतीने माढा येथे राज्यस्तरीय ऊस परिषदेचे आयोजन केले आहे. ही एकदिवसीय परिषद 23 जुलैला सकाळी दहा ते पाच या वेळेत होणार आहे. राज्यभरातील जवळपास 500 ऊस उत्पादक या परिषदेस उपस्थित राहणार आहेत.

या परिषदेमध्ये एकरी जास्त उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना "महाराष्ट्र ऊस भूषण कार्यगौरव पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात येणार आहे. या परिषदेमध्ये कृषिभूषण संजीव माने (सांगली), मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव येथील शास्त्रज्ञ डॉ. सुरेश पवार, कृषितज्ज्ञ सुरेश माने-पाटील, "आत्मा'चे प्रकल्प संचालक विजयकुमार बरबडे हे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. महाराष्ट्र ऊस उत्पादक संघाचे अध्यक्ष अतुल माने-पाटील हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. या ठिकाणी माती व पाणी परीक्षणाची सोय केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्याचे नमुने घेऊन या परिषदेला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: solapur news 23rd july sugarcane conferance in madha