सोलापूर महापालिकेस 41.59 कोटी मंजूर

विजयकुमार सोनवणे
मंगळवार, 27 मार्च 2018

सोलापूर, ता. 27 ः केंद्र शासनाच्या 14 वित्त आयोगापोटी राज्य शासनाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना अनुदान वितरीत केले आहे. त्यामध्ये सोलापूर महापालिकेस 41.59 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. जिल्ह्यातील नगर परिषद, नगर पंचायती या स्थानिक संस्थांना सुमारे 22 कोटींचे अनुदान मिळाले आहे. 

राज्यातील 372 संस्थांना 952 कोटी 91 लाख 50 हजार रुपये अनुदान मंजूर झाले आहे. लोकसंख्या व क्षेत्रफळाच्या निकषानुसार हे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. त्यामध्ये सर्व ड वर्ग महापालिका आणि पात्र नगर परिषद व नगर पंचायतींचा समावेश आहे. 

सोलापुरातील स्थानिक स्वराज्य संस्था व कंसात रक्कम रुपयांत ः महापालिका (41.59 कोटी), बार्शी (5.37 कोटी), पंढरपूर (4.30 कोटी), करमाळा (1.01 कोटी), सांगोला (2.32 कोटी), अक्कलकोट (1.71), मंगळवेढा (91.62 लाख), मैंदर्गी (53.53 लाख), दुधनी (48.29 लाख), कुर्डूवाडी (1.01कोटी), माळशिरस (1.38 कोटी), मोहोळ (1.70कोटी), माढा (65.71लाख).

Web Title: solapur news 41.59 crore approved for Solapur Municipal Corporation