प्रश्‍न ऊसदराचा : सहकारमंत्री, कारखानदारांच्या निषेधार्थ मुंडण 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 नोव्हेंबर 2017

साला पहिली उचल विना कपात 2 हजार 700 रुपये मिळावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि रयत क्रांती संघटनेच्यावतीने गेल्या चार दिवसांपासून उपोषण सुरू होते. सहकारमंत्री सुभाष देशमुख व जिल्ह्यातील कारखानदारांनी तोडगा न काढल्याने या दोघांच्या निषेधार्थ मुंडण आंदोलन करून हे उपोषण मागे घेण्यात आले

सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होऊन 18 दिवस झाले तरीही जिल्ह्यातील उसाची पहिली उचल निश्‍चित झालेली नाही. उसाला पहिली उचल विना कपात 2 हजार 700 रुपये मिळावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि रयत क्रांती संघटनेच्यावतीने गेल्या चार दिवसांपासून उपोषण सुरू होते. सहकारमंत्री सुभाष देशमुख व जिल्ह्यातील कारखानदारांनी तोडगा न काढल्याने या दोघांच्या निषेधार्थ मुंडण आंदोलन करून हे उपोषण मागे घेण्यात आले. 

कार्यकर्त्यांनी मुंडण करून निषेध केला. जिल्ह्यातील साखर कारखानदार अडमुठी भूमिका घेत असल्याची आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी मनसे पंढरपूर तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, मनसे विभाग प्रमुख नागराज स्वामी ,शाखा अध्यक्ष अशोक साळुंखे, दीपक गायकवाड, प्रशांत पाटील यांनी मुंडण केले. याप्रसंगी यावेळी मनसे जिल्हा संघटक दिलीपबापू धोत्रे, रयत क्रांती संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष दीपक भोसले, मनसेचे जिल्हा अध्यक्ष विनायक महिंद्रकर, जैनू द्दीन शेख, सुनील हिबरे, रमेश हसापुरे, वैभव धोत्रे, दिनेश कुलकर्णी, फिरोज शेख, अमोल चव्हाण, श्रीधर गुडेली, दीपक भंडारे, सोमनाथ भोसले, छगन पवार, बळिराम गायकवाड, सुनील पाटील, प्रताप गायकवाड, मनसे महिला आघाडीच्या जयश्री हिरेमठ, करुणा यादव, सरस्वती गोसावी, सुनीता जाधव सोपान महिंद्रकर, नंदू कुमठेकर, प्रसाद कुमठेकर आदी उपस्थित होते. 

Web Title: solapur news: agitation