बार्शीत वकिलांना अपमानास्पद वागणूक; कामबंद आंदोलन सुरू

सुदर्शन हांडे
सोमवार, 10 जुलै 2017

बार्शी (सोलापूर): येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यालायचे दुसरे अप्पर जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिरुद्ध प्रतिनिधी यांनी शनिवारी (ता 8) लोकन्यायालय कामकाज बंद करण्याच्या करणावरून असंसदीय भाषा वापरत वकिलांना अपमानास्पद वागणूक दिल्याचा निषेधार्थ तसेच सदर न्यायाधीशांवर कारवाई होत नाही तोपर्यंत न्यायालयाच्या कामकाजात सहभागी होणार नसल्याचे सांगत आजपासून (सोमवार) पासून कामबंद आंदोलन सुरू केले.

बार्शी (सोलापूर): येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यालायचे दुसरे अप्पर जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिरुद्ध प्रतिनिधी यांनी शनिवारी (ता 8) लोकन्यायालय कामकाज बंद करण्याच्या करणावरून असंसदीय भाषा वापरत वकिलांना अपमानास्पद वागणूक दिल्याचा निषेधार्थ तसेच सदर न्यायाधीशांवर कारवाई होत नाही तोपर्यंत न्यायालयाच्या कामकाजात सहभागी होणार नसल्याचे सांगत आजपासून (सोमवार) पासून कामबंद आंदोलन सुरू केले.

या बाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी (ता 8) सकाळी 10.30 ते सायंकाळी 5 या वेळेत लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु सदर लोकन्यायालयाचे कामकाज वकिल व पक्षकारांना कोणतीही पूर्व सूचना न देता दुपारी 1 वाजता बंद करण्यात आले. या बाबत बार्शीतील वकिल मंडळी न्यायाधीशांना सदर प्रकरणी विचारण्यास गेले असता न्यायाधीश अनिरुद्ध प्रतिनिधी यांनी या आधीच्या न्यायाधीशांनी लोकन्यायल्याचे कामकाज दुपारी 1 वाजताच बंद केल होते तेव्हा कोणी काय केल असे म्हणत असंसदीय भाषा वापरत वकिलांना अपमानास्पद वागणूक दिली. या प्रकरणी बार्शी बार असोसिएशन ने निषेध नोंदवत कारवाई होत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन सूरु केले आहे. या प्रकरणी बार असोसिएशन ने मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांच्याकडे तक्रार दिली आहे. यात अप्पर जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिरुद्ध प्रतिनिधी हे सातत्याने वकिलांना डायासवरून अपमानित करतात, उद्धट बोलतात तसेच ते चेंबरमध्ये सिगारेट ओढतात, दररोज 11.30 ते 12.00 पर्यंत ड्रेसकोड मध्ये नसतात असे तक्रारीत म्हंटले आहे. बार असोसिएशन चे अध्यक्ष अँड. राहुल झालटे, अँड.एस लकशेट्टी, अँड. विकास जाधव, अँड. एस. बी. टिकते, अँड. एस. काटे. अँड. के. बी. सरवदे, अँड. एस. एन. काझी, अँड. महेश चव्हाण, अँड. येडके यांचासह सर्वच वकिलांनी काम बंद आंदोलनात सहभाग घेतला. वकीलांनी अचानक सुरू केलेल्या काम बंद आंदोलनामुळे पक्षकारांना नाहक त्रास सहन करावा लागला. न्यायालयातील प्रशासकीय कामकाज मात्र सुरळीत चालू होते.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
नौगाम सेक्टरमध्ये चकमकीत 2 दहशतवादी ठार
बोट बुडण्यापूर्वी फेसबुकवर केले Live; दोघांचा मृत्यू, 6 बेपत्ता
डेक्कन क्वीनला 1 तास उशीर; प्रवाशांचे आंदोलन
ड्रॅगनची नजर ‘कोंबडीच्या माने’वर​
पुरुषाने दिला मुलीला जन्म​
सिन्नर तालुक्यात शाळकरी मुलीची गळफास घेऊन आत्महत्या​
भूमाफियांमुळे नेवाळी आंदोलनाला हिंसक वळण- आमदार गायकवाड​

मुजोर रिक्षाचालकांविरोधात डोंबिवलीकरांचे 'प्रोटेक्ट अगेन्स्ट रिक्षावाला“
बिल्डर जगदीश वर्मा हत्या प्रकरण; आरोपीची पुराव्याअभावी मुक्तता​
विंडिजकडून भारताचा दारुण पराभव; लुईसचे शतक​

Web Title: solapur news barshi advocate strike and court