महापौर-शहराध्यक्षांची समिती साधणार 'समन्वय' 

विजयकुमार सोनवणे 
बुधवार, 21 मार्च 2018

मानपत्राची रंगली चर्चा 
महापालिका सभा होण्यापूर्वी पक्षनेते संजय कोळी यांच्या कार्यालयात मानपत्राविषयी चर्चा रंगली. झालेला प्रकार चुकीचा असल्याचे सर्वमत झाले. मानपत्रात नेमके काय लिहिले आहे हे कुणी विचारले तर त्यांना काय सांगायचे, असा प्रश्‍नही या वेळी उपस्थित झाला. भाजपचे नगरसेवक राजेश काळे यांनी मानपत्राच्या एकूणच प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली होती. तसे लेखी पत्र दिल्यास ते प्रदेश समितीकडे पाठविण्याचे आश्‍वासन श्री. कोळी यांनी श्री. काळे यांना दिले आहे.

सोलापूर : शहर भाजपमधील बहुचर्चित गटबाजी संपविण्याचा विडा शहर समिती आणि महापालिकेतील काही पदाधिकाऱ्यांनी उचलला आहे. त्यानुसार लवकरच महापौर-शहराध्यक्षांच्या नेतृत्वाखालील समिती निर्माण केली जाणार आहे. ज्येष्ठता व अनुभवानुसार कोणत्या नगरसेवकाला कोणत्या समितीत स्थान द्यायचे याचा निर्णय समिती घेणार आहे व तो सर्वांसाठी बंधनकारक असणार आहे. 

विरोधकांच्या एकजुटीच्या पार्श्‍वभूमीवर सत्ताधारी भाजप एकत्रित आले आहेत. मात्र, त्यांच्यातील अंतर्गत धुसफूस सुरूच आहे. त्यामुळे शहरवासीयांसमोर भाजपबाबत वेगळेच चित्र जात आहे. त्याची दखल प्रदेश पातळीवरून घेण्यात आली आहे. नूतन संघटनमंत्री विजय पुराणिक यांनी हा प्रकार फार गांभीर्याने घेतला आहे. गटबाजी संपलीच पाहिजे याचे संकेत त्यांनी काही दिवसांपूर्वी झालेल्या पुण्यातील बैठकीत दिले आहेत. 

महापालिकेतील कारभार एकोप्याने व्हावा यासाठी महापौर, उपमहापौर, सभागृहनेते यांच्यासह शहराध्यक्षांच्या समितीची नियुक्ती केली जाणार आहे. ही समिती प्रत्येक नगरसेवकाकडून लेखी म्हणणे मागविणार आहे. पक्षाने दिलेली कोणती जबाबदारी पार पाडण्यात तुम्ही सक्षम आहात यासह पालिकेतील कोणत्या पदावर काम करण्यास आवडेल असे प्रश्‍न संबंधितांना विचारले जाणार आहेत. त्यानुसार संबंधित नगरसेवकांना समित्यांवर संधी दिली जाणार आहे. या निर्णयाचे सर्वसामान्य भाजपप्रेमी कार्यकर्त्यांतून समाधान व्यक्त होत आहे. 

मानपत्राची रंगली चर्चा 
महापालिका सभा होण्यापूर्वी पक्षनेते संजय कोळी यांच्या कार्यालयात मानपत्राविषयी चर्चा रंगली. झालेला प्रकार चुकीचा असल्याचे सर्वमत झाले. मानपत्रात नेमके काय लिहिले आहे हे कुणी विचारले तर त्यांना काय सांगायचे, असा प्रश्‍नही या वेळी उपस्थित झाला. भाजपचे नगरसेवक राजेश काळे यांनी मानपत्राच्या एकूणच प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली होती. तसे लेखी पत्र दिल्यास ते प्रदेश समितीकडे पाठविण्याचे आश्‍वासन श्री. कोळी यांनी श्री. काळे यांना दिले आहे.

Web Title: Solapur news BJP in municipal corporation