सोलापूर महापालिकेत भाजपविरोधात आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

सोलापूर - शहरातील नागरी समस्यांकडे लक्ष देण्यात सत्ताधारी भाजपला अपयश आल्याचा ठपका ठेवीत, महापालिकेतील शिवसेना वगळता इतर सर्व विरोधी पक्षातील नगरसेवकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

सोलापूर - शहरातील नागरी समस्यांकडे लक्ष देण्यात सत्ताधारी भाजपला अपयश आल्याचा ठपका ठेवीत, महापालिकेतील शिवसेना वगळता इतर सर्व विरोधी पक्षातील नगरसेवकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, बहुजन समाज पक्ष, एमआयएम व माकपच्या नगरसेवकांनी या आंदोलनात सहभाग घेतला. विशेष म्हणजे जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत या विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी सत्ताधाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले होते. तसेच ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आटापिटा केला होता. आता विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी वेगळी भूमिका घेतली आहे. शहरातील नागरी समस्यांकडे लक्ष देण्यात सत्ताधारी भाजपला अपयश आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विरोधी पक्षांच्या आंदोलनापासून शिवसेनेने अलिप्त राहण्याची भूमिका स्वीकारली.

Web Title: solapur news bjp oppose agitation in solapur municipal