महाविद्यालय, वसतिगृहात बसवा अलार्म

शीतलकुमार कांबळे
सोमवार, 31 जुलै 2017

रॅगिंग टाळण्यासाठी यूजीसीच्या सूचना; दंडात्मक कारवाईचा इशारा
सोलापूर - रॅगिंगच्या वाढत्या घटनांचा विचार करून यूजीसीने (विद्यापीठ अनुदान आयोग) विद्यापीठ व महाविद्यालयांना नव्या सूचना केल्या आहेत. यात महाविद्यालय व वसतिगृहात अलार्म बसविण्याची सूचना केली आहे. या संबंधीचे परिपत्रक देशातील सर्व विद्यापीठांना पाठविण्यात आले आहे.

रॅगिंग टाळण्यासाठी यूजीसीच्या सूचना; दंडात्मक कारवाईचा इशारा
सोलापूर - रॅगिंगच्या वाढत्या घटनांचा विचार करून यूजीसीने (विद्यापीठ अनुदान आयोग) विद्यापीठ व महाविद्यालयांना नव्या सूचना केल्या आहेत. यात महाविद्यालय व वसतिगृहात अलार्म बसविण्याची सूचना केली आहे. या संबंधीचे परिपत्रक देशातील सर्व विद्यापीठांना पाठविण्यात आले आहे.

शैक्षणिक संस्थांनी यूजीसीने सांगितल्याप्रमाणे रॅगिंग न होण्यासाठी आवश्‍यक त्या सुधारणा न केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, असे यूजीसीचे सचिव डॉ. जसपाल संधू यांनी परिपत्रकात नमूद केले आहे. रॅगिंग संबंधी तक्रार असल्यास विद्यार्थ्यांनी अँटी रॅगिंग हेल्पलाइनवर 1800-180-5522 संपर्क साधावा. तसेच, helpline@antiragging.in येथे ई-मेलद्वारे अथवा संकेतस्थळ www.antiraging.in येथे संपर्क साधता येईल. यूजीसीने नेमलेली परीक्षण समितीला फक्त अडचणीच्या काळात 09871170303,09818400116 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या नियमांचे पालन करणे बंधनकारक
महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा, अँटी रॅगिंग समिती, अँटी रॅगिंग कार्यशाळा, रॅगिंग रोखण्यासंबंधीच्या सूचना संकेतस्थळावर देणे, नियमितपणे विद्यार्थ्यांशी संवाद साधावा, माहिती पत्रकांचे वाटप करणे तसेच वसतिगृह, कॅन्टीन, शौचालय आणि इतर ठिकाणी अचानक तपासणी करणे आदी महत्त्वाची पाऊले वसतिगृह व महाविद्यालयांना उचलावी लागणार आहेत.

रॅगिंग प्रकार हे व्यावसायिक अभ्यासक्रम तसेच, वैद्यकीय अभ्यासक्रम राबविणाऱ्या शैक्षणिक संस्थांमध्ये घडतात. जवळपास सर्वच महाविद्यालयात अँटी रॅगिंग समितीची स्थापना करण्यात आली आहे. सर्व महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना ड्रेसकोड करणे, ओळखपत्राशिवाय प्रवेश न देणे, सीसीटीव्ही बसविणे यासारखे उपाय केल्यास बऱ्याच अंशी रॅगिंगवर प्रतिबंध ठेवता येईल. रॅगिंग हाऊ नये याची जबाबदारी महाविद्यालयांनी घेणे गरजेचे आहे.
- डॉ. आबासाहेब देशमुख, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राचार्य महासंघ

देशातील रॅगिंगसंबंधीची सद्यःस्थिती
एकूण तक्रारी- दोन हजार 726
तक्रारीचा निपटारा - दोन हजार 605
कॉल सेंटरकडे असलेल्या तक्रारी - 45
निरीक्षण समितीकडील तक्रारी- 5
यूजीसीकडे असलेल्या तक्रारी - 49
विविध समितीकडे असलेल्या तक्रारी - 22

Web Title: solapur news college hostel alarm