"पेट्रोल, डिझेल, गॅसची दरवाढ रद्द करा' 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

सोलापूर - नोटाबंदी आणि जीएसटीमुळे देशात मंदीची परिस्थीती निर्माण झाली आहे. सरकारने पेट्रोल, डिझेल आणि गॅसची दरवाढ रद्द करा नाहीतर खुर्च्या खाली करा, असा इशारा आमदार प्रणिती शिंदे यांनी आज येथे सरकारला दिला. 

सोलापूर - नोटाबंदी आणि जीएसटीमुळे देशात मंदीची परिस्थीती निर्माण झाली आहे. सरकारने पेट्रोल, डिझेल आणि गॅसची दरवाढ रद्द करा नाहीतर खुर्च्या खाली करा, असा इशारा आमदार प्रणिती शिंदे यांनी आज येथे सरकारला दिला. 

सोलापूर शहर युवक कॉंग्रेसच्यावतीने आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युवकचे शहराध्यक्ष अंबादास करगुळे यांच्या नेतृत्वाखाली जीवनावश्‍यक वस्तूंच्या दरवाढीविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी नगरसेवक चेतन नरोटे, विनोद भोसले, माजी महापौर संजय हेमगड्डी, नगरसेवक रियाज हुंडेकरी नगरसेविका वैष्णवी करगुळे, नगरसेविका फिरदोस पटेल, माजी महापौर अलका राठोड, प्रदेश युवक सचिव राहूल वर्दा, एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष गणेश डोंगरे, महिला अध्यक्षा हेमा चिंचोळकर, अरुणा वर्मा, शहर मध्य युवक अध्यक्ष अर्जुन साळवे, विवेक कन्ना, तिरुपती परकीपंडला, लोकसभा उपाध्यक्ष सैपन शेख, संतोष अटेल्लूर यांच्या प्रमुथ उपस्थितीत निदर्शने करण्यात आली. 

यावेळी आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, ""गेल्या तीन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव 50 टक्‍क्‍यांपेक्षा कमी झाले असताना देशात पेट्रोल, डिझेल, गॅसचे व जीवनावश्‍यक वस्तुंचे दर वाढले आहेत. त्याचा फटका सर्व क्षेत्राला बसला असून महागाई प्रचंड वाढली आहे. भाजपने जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखविले होते. हे ते अच्छे दिन का? जीएसटी आणि नोटाबंदीमुळे अनेकांचा रोजगार रोजगार सरकारने हिरावून घेतला आहे. सरकारच्या फायद्यासाठी लावलेल्या करांमुळे गरीबांचे हाल होत आहेत. सरकराने दरवाढ मागे घेतली नाही तर आणखी तीव्र आंदोलन करु.'' 

आंदोलनात राजन कामत, अंबादास गुत्तीकोंडा, राजासाब शेख, सुभाष वाघमारे, युवराज जाधव, अनिल मस्के, संतोष कामाठी, सुमन जाधव, यल्लप्पा तुपदोळकर, प्रमिला तुपलवंडे, प्रविण जाधव, हैदर मुजावर, शरद गुमठे, श्रीनिवास परकीपडंला, प्रतिक शिंगे, अभिषेक गायकवाड, शोभा बोबे यांच्यासह कॉंग्रेसचे अनेक नेते कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी जाले होते. 

Web Title: solapur news congress