'भाजपच्या आडमुठ्या धोरणामुळे सोलापुरात मंदीचे वातावरण'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

सोलापूर - भाजप सरकारच्या अवकृपेने सोलापुरातील सर्व क्षेत्रांत मंदीचे वातावरण असून कामगार बेरोजगार होत आहेत. भाजपच्या आडमुठ्या धोरणांमुळे व अन्यायकारक करवाढीमुळे सोलापुरात ऐन दिवाळीत सुद्धा संपूर्ण व्यापार ठप्प झाला आहे. कामगार, कष्टकरी, शेतकरी हा अडचणीत असल्याने सोलापूरकरवासीयांची दिवाळी ही कदाचित काळी दिवाळी साजरी होईल काय अशी परिस्थिती सोलापुरात निर्माण झाली असल्याचे आमदार प्रणिती शिंदे आणि सोलापूर शहर कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष प्रकाश वाले यांनी असे संयुक्त पत्रक काढले आहे. 

पत्रकात म्हटले आहे, सोलापुरातील यंत्रमाग उद्योग बंद पडला आहे. त्यामुळे 60 हजार यंत्रमाग कामगारांना पगार मिळत नाही. यंत्रमाग कामगारांचा रोजीरोटीचा प्रश्‍न अतिशय बिकट बनला आहे. तसेच विडी कामगारांचा रोख स्वरूपात हातात पगार मिळण्याचा प्रश्‍नही सुटलेला नाही. विडी कामगारांना बॅंकेत तीन हजार रुपये मिनियम बॅलन्स ठेवण्याची सक्ती करण्यात येत आहे व याबाबत बॅंका अत्यंत उदासीन आहेत. महापालिकेत परिवहन कर्मचारी यांना सात महिने पगार मिळाला नाही. महापालिका अंकित शिक्षण मंडळातील शिक्षकांचा पगार झालेला नाही. महापौर व पदाधिकारी यांच्या भांडणात शहराचा विकास ठप्प झाला असून सर्व विकासकामे बंद पडली आहेत. शहरातील पाणीपुरवठा सणाच्या काळात पूर्णपणे विस्कळित झाला आहे. कचऱ्याची विल्हेवाट लावली जात नाही. त्यामुळे संपूर्ण शहर अस्वच्छ व दुर्गंधीयुक्त झाले असून त्यामुळे साथीचे आजार पसरत आहेत. 

सोलापूर शहराकरिता दोन मंत्री, एक खासदार असताना सुद्धा गेल्या तीन वर्षांत एकही विकासकामे झाली नाहीत. ज्या योजना चालू होत्या त्या बंद पडल्या आहेत. जी कामे पूर्वीच्या सरकारने चालू केली ती पण नेण्यात हे दोन मंत्री व खासदार संपूर्णपणे अपयशी ठरत आहेत, असेही निवेदनात म्हटले आहे.

Web Title: solapur news congress bjp Praniti Shinde