शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी मुहूर्त कशाला?: मोहन जोशी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 जून 2017

आम्हाला जनतेने निवडणुकीत नाकारले आहे. त्यामुळे विरोधात बसूनच आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू, ध्येय धोरणे राबवू. पाच वर्षे हीच आमची भूमिका राहील. सरकारने आयोगाची अंमलबजावणी करावी यासाठी सातत्याने पाठपुरावा करू.

सोलापूर - शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्यासाठी 31 ऑक्‍टोबरचा मुहूर्त कशाला हवा, अशी विचारणा प्रदेश कॉंग्रेस समितीचे सरचिटणीस तथा निरीक्षक मोहन जोशी यांनी केली. 

सोलापुरात आयोजिलेल्या कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले,"भाजप सरकारला शेतकरी कर्जमुक्त करायचे असते तर त्यांनी मुर्हूत पाहिले नसते. तातडीने निर्णय घेऊन कार्यवाही केली असती. मात्र भाजपचा खरा चेहरा आता उघड होऊ लागला आहे. येत्या निवडणुकीत मतदारच आता त्यांना त्यांची जागा दाखवून देतील.'' 

राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याची शक्‍यता की आहे, असे सांगून जोशी म्हणाले,"आम्हाला जनतेने निवडणुकीत नाकारले आहे. त्यामुळे विरोधात बसूनच आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू, ध्येय धोरणे राबवू. पाच वर्षे हीच आमची भूमिका राहील. सरकारने आयोगाची अंमलबजावणी करावी यासाठी सातत्याने पाठपुरावा करू.'' या वेळी शहराध्यक्ष सुधीर खरटमल,प्रदेश सरचिटणीस धर्मा भोसले उपस्थित होते. 

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
मुख्यमंत्री येईपर्यंत जाळू नका; शेतकऱ्याने चिठ्ठी लिहून केली आत्महत्या
तिडके, डोईफोडेचे अपराध अन् निशब्द पंकजा
म्यानमारच्या विमानाचे अंदमानमध्ये सापडले अवशेष; सर्व प्रवाशांचा मृत्यू
मंदसोरच्या जिल्हाधिकारी, एसपींची बदली; राहुल गांधी शेतकऱ्यांच्या भेटीला
धुळे: कर्जमाफीसाठी शिवसेनेचे 'जलसमाधी' आंदोलन
पाकिस्तानचा दक्षिण आफ्रिकेवर 19 धावांनी विजय​
#स्पर्धापरीक्षा - बुद्धिबळ : कार्लसनची जगज्जेतेपदाची हॅट्ट्रीक​
शेतकऱ्यांच्या जिवावर उठलेले सरकार आंदोलनावरून काँग्रेस, माकपचे टीकास्त्र​
जनावरे खरेदी-विक्री निर्बंधास सर्वोच्च न्यायालयात आव्हान

Web Title: Solapur News Congress leader Mohan Joshi criticize BJP