कॉंग्रेस शहराध्यक्ष खरटमल यांचा तडकाफडकी राजीनामा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

सोलापूर - कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी आज आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना त्यांनी राजीनाम्याचा फॅक्‍स पाठविला. शुक्रवारी दुपारी पत्रकार परिषदेत त्यांनी स्वतःहून राजीनाम्याची माहिती दिली. 

श्री. खरटमल म्हणाले, ""कठीण परिस्थितीत मी शहराध्यक्षपदाचा पदभार घेतला. पक्षसंघटना वाढवण्याचा प्रयत्न केला. दीड वर्षाच्या कार्यकाळात सर्वांचे सहकार्य लाभले. उद्यापासून मी कॉंग्रेसचा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. कुणीही सांगितले तर अध्यक्षपद स्वीकारणार नाही.'' 

तडकाफडकी राजीनामा देण्यामागचे कारण त्यांनी अखेरपर्यंत सांगितले नाही. तथापि, पक्षांतर्गत विरोधक सक्रिय झाल्याने त्यांनी राजीनामा देण्याचा मार्ग स्वीकारला असावा असे बोलले जात आहे. राजीनामा देण्यापूर्वी त्यांनी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याशीही चर्चा केली नसल्याचे समजते. श्री. खरटमल यांनी राजीनामा दिल्याने या पदासाठी प्रदेश सरचिटणीस धर्मा भोसले, सुनील रसाळे, राजन कामत, अंबादास गुत्तीकोंडा, मनीष गडदे यांची नावे प्रामुख्याने चर्चेत आहेत. ऐनवेळी इतर नावही पुढे येऊ शकते. ज्यांनी हे पद स्वीकारणार नाही, अशी भूमिका घेतली आहे, त्यांच्यावरही ही जबाबदारी दिली जाऊ शकते आणि पक्षाचा आदेश म्हणत तेही जबाबदारी स्वीकारतील, असे कॉंग्रेसच्या गोटातून सांगण्यात आले. 

असा आहे निरीक्षक राकेश सिन्हा यांचा दौरा 
रविवारी (ता. 17) ः दुपारी 12 ः शहर व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांबरोबर चर्चा, तीन ः शहर पदाधिकारी व समन्वय समिती सदस्य चर्चा, सायंकाळी पाच ः ब्लॉक अध्यक्षांबरोबर बैठक. 
सोमवारी (ता. 18) ः सकाळी 11 ः जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक, दुपारी दोन ः ज्येष्ठ कॉंग्रेस नेत्यांबरोबर बैठक, तीन ः जिल्हा ब्लॉक समिती बैठक, सायंकाळी पाच ः समन्वय समिती सदस्य, आजी-माजी आमदार, खासदार. 

Web Title: solapur news congress sudhir kharatmal resign