शहराध्यक्ष निवडीचे अधिकार सुशीलकुमार शिंदेंना 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

सोलापूर - सोलापूर शहर कॉंग्रेसचा अध्यक्ष, ब्लॉक अध्यक्ष आणि संपूर्ण शहर कार्यकारिणी निवडण्याचा निर्णय माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना देण्याचा निर्णय आज (रविवारी) शहर कॉंग्रेसच्या बैठकीत घेण्यात आला. निरीक्षक राकेश सिन्हा यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा ठराव सर्वानुमते मांडण्यात आला. 

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, महिला अध्यक्षा हेमा चिंचोळकर, सुनील रसाळे, ए. डी. चिनीवार, सिद्धाराम चाकोते, अंबादास गुत्तीकोंडा, हाजीमलंग नदाफ यांची प्रमुख उपस्थिती होती. निवडीचे अधिकार शिंदे यांना द्यावेत असा ठराव नदाफ यांनी या बैठकीत मांडला. या ठरावाला उपाध्यक्ष सुनील रसाळे, ब्लॉक अध्यक्ष चाकोते यांनी अनुमोदन दिले. उपस्थित कार्यकर्त्यांनी या ठरावाला टाळ्या वाजवून मंजुरी दिली. 

निरीक्षक सिन्हा यांचे आज सकाळी सिद्धेश्‍वर एक्‍स्प्रेसने सोलापूरला आगमन झाले. सकाळी 11 ते सायंकाळी सातपर्यंत त्यांनी सर्व ब्लॉक अध्यक्षांच्या भेटी घेतल्या, त्यांच्याशी चर्चा केली. या वेळी माजी महापौर संजय हेमगड्डी, गटनेते चेतन नरोटे, नगरसेविका वैष्णवी करगुळे, अनुराधा काटकर, परवीन इनामदार, प्रवीण निकाळजे, विनोद भोसले, माजी अध्यक्ष किसन मेकाले आदींनी निरीक्षकांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

Web Title: solapur news congress sushilkumar shinde