प्रांतअधिकाऱ्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 जानेवारी 2018

सोलापूर - सरकारी कर्तव्यावर असलेल्या प्रांत अधिकाऱ्याच्या अंगावर वाळूचा टीपर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रांतअधिकारी शिवाजी नवनाथ जगताप (वय 33, रा. हरेश्‍वरा अपार्टमेंट बसवेश्‍वरनगर, होटगी रोड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन टीपरचा चालक व इतर तीन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जगताप हे गुरुवारी (ता. 4) रात्री दहाच्या सुमारास बसवेश्‍वरनगर येथील लोखंडवाला प्रेस्टीज येथे कर्तव्यावर होते. त्या वेळी त्यांना सदर टीपर आढळला.

सोलापूर - सरकारी कर्तव्यावर असलेल्या प्रांत अधिकाऱ्याच्या अंगावर वाळूचा टीपर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रांतअधिकारी शिवाजी नवनाथ जगताप (वय 33, रा. हरेश्‍वरा अपार्टमेंट बसवेश्‍वरनगर, होटगी रोड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन टीपरचा चालक व इतर तीन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जगताप हे गुरुवारी (ता. 4) रात्री दहाच्या सुमारास बसवेश्‍वरनगर येथील लोखंडवाला प्रेस्टीज येथे कर्तव्यावर होते. त्या वेळी त्यांना सदर टीपर आढळला. हा ट्रक त्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने त्याच्यावरील कारवाई टाळण्याच्या हेतूने गाडी जगताप यांच्या अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच, त्याच्यासोबतच्या तीन व्यक्तींनी त्यांना दमदाटी केली. अशा प्रकारे सरकारी कामात अडथळा निर्माण केला, असे जगताप यांनी फिर्यादीत म्हटले आहे. 

Web Title: solapur news crime