'राष्ट्रवादी'ने घातले नोटाबंदी निर्णयाचे श्राद्ध

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

सोलापूर - शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे बुधवारी सकाळी गणपती घाटावरील दशक्रिया विधीच्या ठिकाणी भाजप सरकारच्या नोटबंदी निर्णयाचे वर्षश्राद्ध घालून पिंडदान करण्यात आले. कार्यकर्त्यांनी मुंडण करून सरकारच्या तीन वर्षाच्या सुमार कामगिरीविरुद्ध निदर्शने केली.

"भाजप सरकार हाय हाय, पुढच्या वर्षी बाय बाय", "भाजपचे तीन साल महाराष्ट्र बेहाल'च्या घोषणांनी गणपती घाट परिसर दणाणला होता. या आगळ्यावेगळ्या आंदोलनाचे नेतृत्व शहराध्यक्ष भारत जाधव आणि कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी केले. नोटांचे छायाचित्र असलेल्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रकाश जाधव आणि दीपक इरवडकर या कार्यकर्त्यांनी मुंडण केले. नंदू पाठक आणि रमेश पाठक यांनी पौरोहित्य केले. लक्तरे टांगणारे लक्षवेधी फलक

"फसव्या घोषणाबाजी करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो', "भाजप के तीन साल, महाराष्ट्र बे हाल', "नोटाबंदी योजना सामान्य जनतेला फसविणारी योजना', "शेतीमालाला हमीभाव न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो', "मेक इन महाराष्ट्र, फेक इन महाराष्ट्र', "नोटा बदलून घेताना जीव गमावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली', "खोटी कर्जमाफी करून शेतकऱ्यांना फसविणाऱ्या सरकारचा धिक्कार असो', "येतंय का ऐकू, सरकार आहे फेकू', "सरकार की नियत है गंदी, इसलिये है आर्थिक मंदी', "देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करणाऱ्या नोटाबंदी निर्णयाचा निषेध असो', अशा फलकांच्या माध्यमातून सरकारची लक्तरे वेशीवर टांगण्यात आली.

Web Title: solapur news currency ban decission shraddha