सोलापुरात पुन्हा ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये कुत्र्यांची गणना

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जुलै 2017

प्रजनन दर आणि लसीकरणाची उपयुक्तता तपासण्यासाठी "एट्ररी'चा प्रकल्प

सोलापूर: सोलापुरात गेल्या वर्षी केलेल्या श्‍वान गणनेत 13 हजार 780 भटके श्‍वान असावेत, असा अंदाज आहे. येत्या ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात पुन्हा सोलापुरात भटक्‍या कुत्र्यांची गणना केली जाणार आहे, अशी माहिती कुत्र्यांच्या प्रजनन दर तपासणी आणि लसीकरणाची उपयुक्तता तपासणाऱ्या "एट्ररी'च्या प्रकल्पाचे समन्वयक डॉ. अभिजित कुलकर्णी यांनी 'सकाळ'ला दिली.

बंगळूरच्या अशोका ट्रस्ट फॉर रिसर्च इन इकॉलॉजी ऍन्ड एन्व्हारमेंट (एट्ररी) या संस्थेच्या वतीने हा प्रकल्प राबविला जात आहे. केंद्र सरकारचा बायोटेक्‍नॉलॉजी विभाग आणि वेलकम ट्रस्ट (यूके) यांच्याद्वारे हा प्रकल्प प्रायोजित केला आहे. मोकाट कुत्री आणि वन्यजीवांत आढणाऱ्या रेबीज या रोगाचा फैलाव समजून घेणे आणि त्यावर उपाययोजना करणे यासाठी "एट्ररी'तर्फे काम केले जात आहे. बंगळूर, सोलापूर, बारामती आणि गोव्याच्या काही भागात हा प्रकल्प राबविला जात आहे, असे सांगून कुलकर्णी म्हणाले, "नुसती कुत्र्यांची संख्या वाढली म्हणून उपयोग नाही तर त्याचा योग्य अभ्यास होणे गरजेचे आहे. कुत्र्यांनी चावा घेतल्यावर योग्य उपचार न घेतल्यास रेबीज झाला तर मृत्यू अटळ आहे. कारण, रेबीजवर प्रतिबंधात्मक उपाययोजना आहेत. उपचार उपलब्ध नाहीत. देशात प्रत्येक वर्षात रेबीजने सुमारे 20 हजार जणांचा मृत्यू होतो. ही सरकारी आकडेवारी आहे. या पलीकडे नोंद न झालेल्या घटनाही अनेक असतात. रेबीज अटोक्‍यात आणण्यासाठी विविध उपाय योजले जातात. रेबीज 2020 पर्यंत जगातून हद्दपार करा, अशा सूचना जागतिक आरोग्य संघटनेने केल्या आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या मागदर्शक सूचनांनुसार भारत सरकारने काम सुरू केले आहे.'

सहकार्य गरजेचे
सोलापुरात गेल्या वर्षी महापालिकेतर्फे चार हजार कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आले. हे अंदाजित एकूण कुत्र्यांच्या संख्येच्या एकतृतीयांश इतके होते. कुत्री वर्षातून दोनदा प्रत्येकी चार ते सहा पिल्लांना जन्म देते. त्यातून किती जगतात, याचीही माहिती कुठेही उपलब्ध नाही. त्यामुळे भटक्‍या कुत्र्यांच्या अचूक गणनेकरता नागरिक, स्थानिक प्रशासन आणि सर्व स्तरातील नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन, असे कुलकर्णी यांनी सांगितले.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:

Web Title: solapur news Dogs count say dr abhijeet kulkarni