सोलापूरः करमाळा तालुक्यात दरोडे पडल्याने घबराटीचे वातावरण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

करमाळा (सोलापूर): करमाळा तालुक्यातील कोर्टी व विहाळ येथे एकाच दिवशी चाकूचा दाख दाखवून दरोडे पडल्याने परीसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

करमाळा (सोलापूर): करमाळा तालुक्यातील कोर्टी व विहाळ येथे एकाच दिवशी चाकूचा दाख दाखवून दरोडे पडल्याने परीसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

येथील कोर्टी (ता. करमाळा) येथे ज्ञानेश्वर नारायण शिंदे यांच्या घरावर 5 दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकून 3 तोळे सोने व रोख रक्कम लंपास केले आहे. यात ज्ञानेश्वर शिंदे यांच्यासह आई व पत्नी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खाजगी रूग्णालयात सधी उपचार सुरू आहेत. या बाबत ज्ञानेश्वर शिंदे यांनी सांगितले की, गुरुवारी (ता. 14) रात्री जेवन झाल्यानंतर घराच्या समोर गप्पा मारत बसलेले असताना रात्री 10 च्या सुमारास चाकू, गज अशी हत्यारे घेऊन 5 अज्ञात चोरटे आले असता त्यांनी थेट मारहाणीस सुरूवात केली. यात ज्ञानेश्वर शिंदे यांनी प्रतिकार करीत विरोध केला असता चोरट्यांनी ज्ञानेश्वर शिंदे यांच्या पाठीत व तोंडावर चाकुने वार केले आहेत. पत्नी राणी शिंदे हिच्या तोंडावर वार केला आहे. आई सरस्वती शिंदे यांच्यावरही वार झाले आहेत.

चोरटे ऐवज लुटून पसार झाल्यावर ज्ञानेश्वर शिंदे यांनी पोलिसांना घडलेला प्रकार कळवला. पोलिसांनी तातडीने दखल घेत रूग्णवाहिका पाठवून जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रूग्णालय करमाळा येथे दाखल केले. सदरील दरोड्याचा प्रकार हा रात्री 10 वाजता झाल्याने इतर गावकरी भयभित झाले आहेत. भारनियमन व पावसाच्या रिपरिपीमुळे ग्रामिण भागातील लोक रात्री लवकरच झोपी जातात. हिच संधी साधत दरोडेखोर हिंमत करून ग्रामिण भागातील वाड्या वस्त्या लुटत आहेत. सदरील घटनेच्या ठिकाणी व जखमींना करमाळा पोलिसांनी भेट दिली असून तपास सुरू आहे.

विहाळ (ता. करमाळा) येथील मल्हारी मारूती मारकड यांच्या वस्तीवर राञी आकरा वाजता चोरट्यांनी 83 हजार रुपये रोख व 4 तोळे सोने चोरून नेले आहे. याशिवाय विहाळ येथील तात्यासाहेब मारकड यांना मारहाण करून चोरी केली. विकास मारकड यांच्या घरावर दगडफेक केली. घटना स्थळाला उपविभागीय पोलिस प्रशांत स्वामी, पोलिस निरीक्षक राजेश देवरे यांनी भेट देऊन पाहाणी केली आहे.

Web Title: solapur news Due to drowsiness in Karmala taluka