शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी प्रयत्न करु: शरद पवार

वसंत कांबळे
शनिवार, 24 मार्च 2018

कुर्डु (सोलापूर): राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना शिक्षक सहकार संघटना व जुनी पेन्शन हक्क संघटन यांच्या वतीने आज (शनिवार) मुंबई येथील सिल्वर ओक निवासस्थानी निवेदन देण्यात आले.

कुर्डु (सोलापूर): राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना शिक्षक सहकार संघटना व जुनी पेन्शन हक्क संघटन यांच्या वतीने आज (शनिवार) मुंबई येथील सिल्वर ओक निवासस्थानी निवेदन देण्यात आले.

या निवेदनामध्ये 1 नोव्हेंबर 2005 नंतर शासन सेवेतील नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, मृत कर्मचाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना तात्काळ कुटुंब निवृत्ती वेतन योजना लागू करणे, राज्यात मागासवर्गीय कक्षाप्रमाणे खुला प्रवर्ग कक्ष स्थापन करणे, आंतरजिल्हा बदली प्रकिया पारदर्शकपणे राबविणे,12 वर्ष सेवाकाल पुर्ण झाल्यानंतर दिल्या जाणाऱ्या वरिष्ठ वेतनश्रेणीसाठीचा 2 अक्टोंबर 2017 चा अन्यायकारक शासन निर्णय रद्द करणे, राज्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे, MSC-IT प्रशिक्षण पुर्ण न केलेल्या शिक्षकांच्या होणार्‍या वसुलीला स्थगिती देणे या प्रलंबित असलेल्या राज्यातील शिक्षकांच्या मागण्या पूर्ण होणेबाबत राज्य सरकारशी चर्चा करुन या मागण्या सोडवण्यासाठी प्रयत्न करु असे आश्वासन पवार यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले.

यावेळी शिक्षक सहकार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष निलेश देशमुख, जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्य समन्वयक संभाजी पोळ, दत्ता मदने, जिल्हाध्यक्ष नितीन तिडोळे,शाहू भारती, सुदर्शन वांगदरे, पांडुरंग ढाकरे, प्रशांत शेळके, विष्णू भोसले, मुकेश बारगळ, गणेश लांडगे, सुनील तुमराम, बाळासाहेब गहिरे, तुकाराम बोराडे, उपस्थित होते.

Web Title: solapur news education primary teacher demands and shrad pawar