पोटनिवडणुकांचे चक्र संपता संपेना! 

विजयकुमार सोनवणे
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

सोलापूर - राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था पोटनिवडणुकांच्या फेऱ्यात सापडल्या आहेत. कोणत्या ना कोणत्या कारणाने जागा रिक्त होते आणि त्या ठिकाणी पोटनिवडणुका लागतात. जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत सुमारे सात ते आठ वेळा पोटनिवडणुका झाल्या. आणखी काही ठिकाणी पोटनिवडणुका लागण्याची शक्‍यता आहे. 

सोलापूर - राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था पोटनिवडणुकांच्या फेऱ्यात सापडल्या आहेत. कोणत्या ना कोणत्या कारणाने जागा रिक्त होते आणि त्या ठिकाणी पोटनिवडणुका लागतात. जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत सुमारे सात ते आठ वेळा पोटनिवडणुका झाल्या. आणखी काही ठिकाणी पोटनिवडणुका लागण्याची शक्‍यता आहे. 

फेब्रुवारी 2017 मध्ये राज्यातील महापालिका व जिल्हा परिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर काही दिवसांतच काही पोटनिवडणुकांचेही बिगुल वाजले. त्यामध्ये पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सोलापूर, नाशिक, जळगाव, नंदुरबार, उस्मानाबाद, लातूर, अमरातवी या जिल्ह्यांतील नगरपंचायती किंवा नगर परिषदांच्या पोटनिवडणुका झाल्या. मार्च 2017 मध्ये सांगली-मिरज-कुपवाड, जळगाव आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेची पोटनिवडणूक लागली. निधन आणि सदस्यत्व अवैध ठरल्याने ही पोटनिवडणूक झाली. 

त्यानंतर धुळे जिल्हा परिषदेची एक आणि अकोला पंचायत समितीच्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक झाली. जूनमध्ये जळगाव, उस्मानाबाद, परभणी, नागपूर, गडचिरोलीमधील नगर परिषद, नगरपंचायतीच्या पोटनिवडणुका झाल्या. जुलै-ऑगस्ट 2017 मध्ये नगर, पुणे आणि अमरावती नगरपालिका, महापालिकांतील रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक झाली. 

सध्या पुणे, वाशीम, हवेली, रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदुरबार, लातूर, अकोला, यवतमाळ जिल्हा परिषदअंतर्गत रिक्त जागांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. याशिवाय नांदेड, सिंधुदुर्ग, रायगड, नाशिक, नंदुरबार, सोलापूर, बीड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, वाशीम व गडचिरोली या जिल्ह्यांतील पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. एकंदरीतच जानेवारीपासून राज्यात कुठेना कुठे निवडूक प्रक्रिया सुरू असल्याचे दिसून येत आहे. 

पोटनिवडणुका लागण्याची कारणे 
सदस्याचे निधन, सदस्याचा राजीनामा, सदस्यास तीन अपत्ये, प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती देणे, जातीचा दाखला अवैध होणे या कारणांनी सदस्यत्व अपात्र झाले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायत आणि महापालिकांमध्ये पोटनिवडणुका लागल्या आहेत.

Web Title: solapur news by-elections