कर्जमाफीच्या यादीत नाव दिसत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल

हुकूम मुलाणी
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

कर्जमाफीतील बनावट लाभार्थ्याची बातमी सकाळने प्रसिध्द केल्यामुळे खडबडून शासन जागे झाले. आज सदरचे संकेतस्थळावर दुरुस्तीच्या नावाखाली बंद असल्यामुळे अनेक शेतकरी बॅकेत व संगणक केंद्रावर माहिती घेण्यासाठी हेलपाटे मारुन थकले आहेत.

मंगळवेढा -- राज्य शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेतील कर्जमाफीच्या लाभातील मंजूर झालेल्या लाभार्थ्याच्या यादीतील लाभार्थ्याची यादीत नाव दिसत नसल्यामुळे तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला

या योजनेचा लाभ मिळावा म्हणून तालुक्यातून तब्बल 23685 इतके अर्जाची नोंद संकेतस्थळावर करण्यात आली पण या योजनेत तालुक्यातील 2007 ते 31 मार्च 2009 या कालावधीत शेतकय्रांना वंचीत ठेवून अगोदरच दुजाभावाची वागणूक दिली. दुष्काळी परिस्थितीने घायकुतीला आलेल्या शेतकय्रांना यातून वंचीत ठेवून एकप्रकारे अन्याय केला तर दुसय्रा बाजूला अर्ज केलेले शेतकरी मात्र सायबर कॅफे व बॅकेला हेलपाटे मारुन मंजूरीत नाव शोधण्यासाठी   त्रस्त झाला,पण किमान आपण केलेला अर्ज मंजूर झाला की नाही हेच कळनासे झाले थकीत शेतकय्रांला कर्जमाफीचा लाभ दिवाळी पुर्वी देण्यात येत असल्याचा गाजावाजा मंत्रीमहोदयानी केला  

आतापर्यत संकेतस्थळावर मोजकीच नावे दिसली. त्यामुळे दिवाळी गोड होण्याच्या आशेवर पाणी पडले अजूनही माफीसाठी वाट पहात असलेल्या शेतकय्रांची अदयापही नावच दिसले नसल्यामुळे निराशा झाली आणि असली कसली कर्जमाफी सरकार देणार याविषयी तीव्र नाराजी प्रकट  करु लागला. पण कर्जमाफीतील बनावट लाभार्थ्याची बातमी सकाळने प्रसिध्द केल्यामुळे खडबडून शासन जागे झाले. आज सदरचे संकेतस्थळावर दुरुस्तीच्या नावाखाली बंद असल्यामुळे अनेक शेतकरी बॅकेत व संगणक केंद्रावर माहिती घेण्यासाठी हेलपाटे मारुन थकले आहेत. तालुक्याच्या ग्रामीण भागातही बॅकेत आलेला शेतकरी शासनाने मंजूरीची यादी संकेतस्थळावर पाठविली मग तुम्ही का सांगत नाही, आमचे नाव आहे का नाही म्हणून शेतकरी प्रश्‍न विचारुन बॅक अधिकाय्रांना भंडावून सोडत आहेत. 66 कलमी माहिती देताना बेजार झालेल्या बॅक अधिकारी सुध्दा  यामुळे त्रस्त झाले आहेत. 

Web Title: solapur news: farmers loan