सोलापूर महापालिकेची आर्थिक स्थिती कोलमडली

विजयकुमार सोनवणे
शुक्रवार, 24 नोव्हेंबर 2017

सोलापूरः महापालिकेची आर्थिक स्थिती कोलमडली असून, तब्बल 373 कोटी 52 लाख रुपये महापालिकेवर देणे आहे. त्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या देय रकमांसह विविध योजनांसाठी भराव्या लागणाऱ्या हिश्‍यांचाही समावेश आहे.

सोलापूरः महापालिकेची आर्थिक स्थिती कोलमडली असून, तब्बल 373 कोटी 52 लाख रुपये महापालिकेवर देणे आहे. त्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या देय रकमांसह विविध योजनांसाठी भराव्या लागणाऱ्या हिश्‍यांचाही समावेश आहे.

महापालिकेला 2016-17 या आर्थिक वर्षात दर महिन्याला सरासरी 15 कोटी 52 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. मात्र प्रत्येक महिन्यास किमान अत्यावश्‍यक खर्च, वेतन, पेन्शन, वीज बिले, पाणी बिल, शिक्षण मंडळाचे वेतन व पेन्शन, परिवहनला आर्थिक साह्य, डिझेल बिले, विविध योजनांचे हप्ते याशिवाय पाणीपुरवठ्यासारख्या तातडीच्या कामांची बिले देण्यासाठी महिन्याला किमान 20 ते 21 कोटी रुपये लागतात. सध्या सरासरी 27 कोटी 72 लाख रुपये उत्पन्न मिळत आहे. अत्यावश्‍यक खर्चाशिवाय, राहिलेल्या रकमेतून मक्तेदारांचे बिल दिले जात आहे.

महापालिकेने दिलेल्या इष्टांकाप्रमाणे वसुली होत नाही. त्यामुळे देय रकमांमध्ये दिवसेन दिवस वाढ होत आहे. 2015-16 आणि 2016-17 या कालावधीत विविध वार्डवाईज व विकास कामासाठी अभिप्राय देण्यात आले आहेत. काही रक्कम खर्चीही पडली आहे. त्यामुळे आर्थिक अडचणी निर्माण होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर वसुली वाढविण्यासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे.

मनपावर असलेल्या थकीत रकमांचा तपशील
घटक रक्कम रुपयांत

कर्मचारी व सेनानिवृत्त 93 कोटी 83 लाख
शिक्षण मंडळ हिस्सा 02 कोटी
भूसंपादन व इतर 08 कोटी
नगरोत्थान रस्ते 12 कोटी
मलनित्सारण 25 कोटी
स्मार्ट सिटी हिस्सा 50 कोटी
शासकीय कर्जे (व्याजासहीत) 27 कोटी 69 लाख
मक्तेदारांची देय रक्कम 152 कोटी
----------------------------------
एकूण 373 कोटी 52 लाख

Web Title: solapur news The financial condition of Solapur Municipal Corporation collapsed