परदेशातील कंपन्या विकत घेण्यास "प्रिसिजन'सरसावली

संजय पाठक
शनिवार, 3 जून 2017

उद्योजक यतीन शहा यांची माहिती; कंपनीचे कर्ज जुलैअखेरीस संपुष्टात येणार

उद्योजक यतीन शहा यांची माहिती; कंपनीचे कर्ज जुलैअखेरीस संपुष्टात येणार
सोलापूर - अशा मंदीच्या काळातही तब्बल अडीचशे कोटी रुपयांच्या ठेवी बॅंकेत पडून आहेत. येत्या सहा महिन्यात अन्य देशांतील समव्यावसायिक कंपन्या थेट विकत घेण्याचा या वर्षअखेरीपर्यंत एक तरी असा व्यवहार कंपनी पूर्ण करेल, अशी माहिती प्रिसिजन कॅमशाफ्ट एम. डी. तथा अध्यक्ष चेअरमन यतीन शहा यांनी दिली.

कार इंजिनचा आत्मा समजला जाणारा कॅमशाफ्ट तयार करणारी अस्सल सोलापुरी प्रिसिजन ही कंपनीचे चायनामधील दोन्ही युनिट पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. कंपनीवर असणारे अवघे 65 कोटींचे कर्ज येत्या जुलै अखेर संपुष्टात येईल. तेथून पुढे कंपनीची भरभराटच असेल. "प्रिसिजन'ला कुठल्याही प्रकारचं आर्थिक कमतरता नाही. आजही आपल्याकडं आर्थिक पाठबळ मोठ्याप्रमाणावर जमा आहे. आता मी प्रत्येक इन्हेस्टरला हेच सांगू इच्छितो की तुम्ही पेशन्स ठेवा, असे यतीन शहा म्हणाले.

आपल्या व्यवसायाशी पूरक असणाऱ्या कंपन्या या वर्षअखेरीपर्यंत खरेदी करण्याच्या जोरदार हालचाली करत असून वर्षअखेरीपर्यंत एक तरी असा व्यवहार कंपनी पूर्ण करेल, अशा विश्‍वास व्यक्त करून श्री. शहा म्हणाले, आम्ही गेल्या काही काळापासून अशा कंपनीच्या शोधात आहोत, की ज्यांची आर्थिक परिस्थिती डबघाईस आलेली असेल. हा आमचा शोध जेव्हा पूर्ण होईल तेव्हा ती कंपनी खरेदी करण्याचा आमचा इरादा पक्का आहे. जागतिक बाजारातील नव्या कंपन्या काबीज करण्याचे आमचे तसे निश्‍चित असे धोरण ठरलेले नाही, तरी कंपनीच्या हिताचा एखादा असा सौदा असेल तर तो पूर्ण करण्यास कंपनी अजिबात मागेपुढे पाहणार नाही. कारण आमच्याकडे भागधारकांचे तब्बल अडीचशे कोटी रुपये शिल्लक आहेत. भागधारकांच्या पैशाला अजिबात धक्का न लावता कंपनीने आजवरची आपली प्रगती केली आहे. ती नजीकच्या टप्प्यात अजून वेगाने होईल, यात शंकाच नाही.

सध्या कंपनीत 150 विविध प्रकारचे कॅमशाफ्ट तयार होतात. आता कंपनी ब्राझीलमध्ये जनरल मोटर्ससाठी स्वतःच्या हिंमतीवर एक प्लांट उभा करणार आहे. यासाठी ऐंशी कोटी रुपये खर्च येणार असून पुढील वर्षी जुलै अखेर हे युनिट सुरू झालेले असेल, असा विश्‍वास श्री. शहा यांनी व्यक्त केला. चायनामधील युनिटसंदर्भात विचारलेल्या प्रश्‍नावर श्री. शहा आत्मविश्‍वासाने म्हणाले, "चायनातील दोन्ही युनिट अतिशय प्रॉफिटेबल सुरू असून तेथे नवनवीन तंत्रज्ञान अंगीकारून आम्ही कार्यरत आहोत.

कंपनीच्या कर्जाविषयी श्री. शहा म्हणाले, आमच्या कंपनीवर अवघे 65 कोटींचे कर्ज असून येत्या काही महिन्यात हे कर्ज पूर्णपणे फेडून त्यापुढे आम्ही दरवर्षी तब्बल शंभर कोटी रुपये शिल्लक टाकू शकू. इतक्‍या वेगाने आमची जागतिक पातळीवर प्रगती सुरू आहे. 2017 च्या मार्च अखेरीस, आर्थिक वर्षात कंपनीचा फायदा 64 टक्‍क्‍यांनी वाढला आहे. म्हणजे तो गेल्यावर्षी 9.50 कोटी होता तो आता 15.61 कोटी झाला आहे.

कंपनीच्या आयपीओबाबत श्री. शहा म्हणाले, "जेव्हा कंपनीचे आयपीओ आले तेव्हा त्यातून अडीचशे कोट उपलब्ध झाले. ते आज देखील तसेच आहेत. कंपनीची जी प्रगती आम्ही करतोय ती आमच्या पैशातून करतोय. म्हणून हे अडीचशे कोटी अजूनही वापरण्यासाठी जसे आहेत तसे आहेतच. "प्रिसिजन' ही कंपनी प्रॉफीटेबल आहे, कर्जमुक्त आहे. आमच्या कंपनीचं हे यश आहे. हे सर्वासामान्य इव्हेस्टरपर्यंत पोचायला हवं.

जर्मनीतील कंपन्यांच्याही पुढे...
जनरल मोटर्समध्ये 60 लोक 25 कॅमशाफ्ट दिवसाला बनवतात. आम्ही नवनव्या तंत्राचा स्वीकार केल्याने आमच्या कंपनीत फक्त नऊ लोकांत 25 हजार कॅमशाफ्ट दिवसाला तयार होतात. ही संख्या आम्ही लवकरच तीनवर आणत आहोत. यामुळं जर्मनीतील कंपन्यांच्याही पुढे असेल सोलापूरची ही कंपनी, असे "प्रिसिजन'चे एम. डी. तथा अध्यक्ष यतीन शहा म्हणाले.

क्त हवेत पेशन्स
जुलै अखेर कंपनी कर्जमुक्त होईल. फार कमी अशा कंपन्या आहेत. एप्रिलमध्ये नेटवर्क 650 कोटींवर असेल. कर्ज नाही, बॅंकेत फंड जमा, दरवर्षी शंभर कोटींची ग्रोथ, नवी टेक्‍नॉलॉजी, असेंबल टेक्‍नॉलॉजी असेल... हा सारा पॉझिटिव्ह इंपॅक्‍ट एक वर्ष ते सहा महिन्यात दिसून येईल. ब्राझीलचे युनिट एप्रिलमध्ये सुरू होईल. चायनाचमधील दोन्ही युनिट एकदम उत्तम सुरू आहेत. फक्त त्यासाठी हवेत पेशन्स.

श्री. शहा म्हणाले, प्रिसिजन कंपनीचा सातशे, साडेसातशे कोटींचा टर्न ओव्हर झाला यंदाच्या वर्षामध्ये. बरं असंही काही नाही की कुठं काही निगेटिव्ह आहे. चायना ऑपरेशन आर गोइंग अ व्हेरी वेल. ब्राझीलची नवी फॅक्‍टरी सुरवात होईल पुढच्या एक दोन महिन्यांमध्ये. चायनाचे दोन्ही जॉईन्ट व्हेंचर उत्तम चाललेलं. तिथं काहीच प्रॉब्लेम नाही. ब्राझीलमध्ये काम सुरू आहे. जर्मनीमध्ये आम्ही सुरवात करतोय. या सर्व गोष्टींचे जर तुम्ही गणित घातलं तर पुढच्या वर्षी डेफीनेटली आमची फायनान्सीय ग्रोथ अधिक चांगली दिसेल. बरं हे करण्यासाठी सगळ्यात महत्वाचे म्हणजे बऱ्याचशा कंपन्यांची बरचसं काही करण्याची इच्छा असते. पण हे सगळं करण्यासाठी कुठल्याही प्रकारचं त्यांच्याकडं आर्थिक पाठबळ नसतं, फायन्सियल स्ट्रेंथ नसते. मग कुठूनतरी कर्ज काढा, अजून काही करा. तसं "प्रिसिजन'ला कुठल्याही प्रकारचं आर्थिक कमतरता नाही. आजही आपल्याकडं आर्थिक पाठबळ जमा आहे. तेव्हा फक्त आता वेळ ही इंपॉर्टंट आहे. प्रत्येक इन्हेस्टरला हेच सांगतो की तुम्ही पेशन्स ठेवा. कसं असतंय, आता उदाहरण म्हणून कोकाकोला किंवा पेप्सीचं घ्या. या कंपन्यांचं आमूक क्वार्टरला सेल वाढलाय, त्याच्या पुढच्या क्वार्टटरला तो कमी झाला. पाऊस, थंडी सुरू झाल्यावर सेल कमी होतो, पुन्हा गर्मी सुरू झाल्यावर वाढतो.

कॅमशाफ्टबाबत तसं होणार नाही. हा स्टेबल बिझनेस आहे. कॅमशाफ्ट हा फंडामेन्टल बिझनेस आहे. त्यामुळं या बिझनेसची अन्य बिझनेसशी तुलना करण्यात काहीच अर्थ नाही. प्रत्येक क्वार्टरला आमचं असं काही कमीजास्त होणार नाही. परंतु आमची जी काही वाढ होईल ती एक वर्षात तुम्हाला म्हणजे इन्व्हेस्टरला दिसेलच. हे अग्गदी शंभर टक्के खरं, यात दुमत असायचं कारणच नाही. सगळ्या गोष्टी आता जुळत आलेल्या आहेत.

श्री. शहा पुढे म्हणाले, मी आज अशा अनेक कंपन्या पाहतो, की ज्यांची आर्थिक परिस्थिती बिघडलेली आहे. दोन दोन महिने कर्मचाऱ्यांचे पगार ते देऊ शकत नाहीत. तरीही त्यांच्या शेअर्सची किंमत वाढलेली दिसते. ते काय करतात मला नाही समजत. पण मला असं वाटतं की एकदा का माणूस त्या नादाला लागलं ना की मूळ धंदा विसरतो. अन्‌ एकाच नादाला लागलो, ते म्हणजे आज आपला शेअर किती आहे, मग त्याला वाढवायचा कसा. मग त्यासाठी चार ब्रोकर्सशी बोला, त्यांना सांगा की तू काहीतरी कर रे बाबा. मग तो म्हणणार मला तुम्ही यातून काहीतरी द्या. मग हे सुरू झालं की आपला मेन बिझनेस जो आहे तो मार खातो. म्हणून मला हे नाही करायचं. त्यामुळं मला काय म्हणायचंय सहा महिने जातील, वर्ष जाईल. लोकांना शेवटी फंडामेंटल कळलं. हे चुकणार नाही. माझं एकच म्हणणं आहे, आज ज्या प्राईजला शेअर ट्रेड करतोय, त्या प्राईजला माझं एकच म्हणणं आहे, मला माहित्येय मी यशस्वी होणारच...! फक्त वेळ लागेल इतकंच. बस्स....!

Web Title: solapur news Foreign companies bought "Precision" to buy