ओला, सुका कचरा विलगीकरण सोमवारपासून

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 जून 2017

सोलापूर - जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सोलापूर शहरातून पाच जूनपासून ओला व सुका कचरा स्वतंत्ररीत्या संकलित करण्यात येणार आहे. त्यासाठी आहे त्या यंत्रणेचा उपयोग केला जाणार आहे. या मोहिमेत सोलापूर शहरातील सर्व नागरिकांनी सहभाग घेऊन स्वच्छ सोलापूर, सुंदर सोलापूरला पाठिंबा द्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी पत्रकार परिषदेत केले. 

सोलापूर शहरातील बागा, फुटपाथ, सार्वजनिक ठिकाणांवर कचराकुंडी लावण्यात येणार आहेत. सोलापूर शहरात सध्या ९५ घंटागाड्यांच्या माध्यमातून कचरा संकलित केला जात आहे. मंगल कार्यालये, हॉटेल या ठिकाणचा कचरा संकलित करण्यासाठी विशेष उपाययोजना करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

सोलापूर शहरातील हौसिंग सोसायट्यांनी त्यांच्या परिसरातील कचरा संकलित करून त्याद्वारे कंपोस्ट खताची निर्मिती करावी. कचरामुक्त सोलापूरसाठी जनजागृती, पथनाट्य, कार्यशाळा असे विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहितीही आयुक्त ढाकणे यांनी दिली. मिशन इंद्रधनुष्यच्या माध्यमातून सोलापूर शहर व परिसरातील शून्य ते पाच वर्षे वयोगटातील मुले, गरोदरमाता यांच्यासाठी लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. 

‘खरमाटे पदभार घेणार असतील तर अडचण नाही’
महापालिकेच्या परिवहन व्यवस्थापकपदाची सूत्रे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांच्याकडे सोपवावीत, अशी मागणी सभापती दैदीप्य वडापूरकर यांनी केली आहे. यावर बोलताना आयुक्त ढाकणे म्हणाले, खरमाटे यांच्याकडून आम्ही तांत्रिक मार्गदर्शन घेतच आहोत. त्यांनी हा पदभार घेतला तर काहीच हरकत नाही. कामगारांना फुकट पगार देणार नसून त्यांनी काम केले पाहिजे. बसची निगा राखली पाहिजे, अशी अपेक्षाही ढाकणे यांनी व्यक्त केली.

Web Title: solapur news garbage solapur municipal corporation