सरकारी कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 मार्च 2018

सोलापूर : सातवा वेतन आयोग लागू न झाल्याने देगाव येथील जनावरांच्या दवाखान्यात एका कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (ता. 9) सायंकाळच्या सुमारास घडली. घटनेच्या ठिकाणी चिठ्ठी सापडली असून, त्यात सातवा वेतन आयोग लागू न झाल्याने आणि कर्ज झाल्याने आत्महत्या करत असल्याचा उल्लेख आहे.

नागनाथ दगडू शिंदे (वय 48, रा. तेलगाव ता. उत्तर सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. शिंदे हे देगाव येथील पशुसंवर्धन विभागाच्या जनावरांच्या दवाखान्यात शिपाई पदावर कामाला होते. शुक्रवारी सायंकाळी दवाखान्यात कोणी नव्हते. दवाखान्याच्या स्टोअर रुममध्ये शिंदे यांनी दोरीने गळफास घेतला. काही वेळाने डॉक्‍टर दवाखान्यात आले. दरवाजा आतून बंद असल्याने डॉक्‍टरांनी खिडकीतून पाहिले तर शिंदे यांनी गळफास घेतल्याचे दिसले. जवळच असलेल्या देगाव पोलिस चौकीत याबाबतची माहिती कळविण्यात आली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन शिंदे यांना खाली उतरविले. त्यांना तत्काळ शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषीत केले. घटनेच्या ठिकाणी चिठ्ठी सापडली असून, सातवा वेतन आयोग लागू न झाल्याने आणि कर्जामुळे आत्महत्या करत असल्याचा उल्लेख असल्याचे पोलिस उपनिरीक्षक डी. के. वाघ यांनी सांगितले. या घटनेची नोंद सलगर वस्ती पोलिसात झाली आहे.

Web Title: solapur news government employee nagnath shinde suicide