ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी मतदारांना खूश ठेवण्याचा प्रयत्न

हुकूम मुलाणी
शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2017

सध्या दिवाळीच्या निमित्ताने येथील दोन्ही गटाकडून साखर, गरा, पोहे, दाळसह आणखी काही संसारोपयोगी साहित्याचे वाटप करुन मतदारांशी जवळीक निवडणुक जाहीर झाली नसताना साधली जात आहे.

मंगळवेढा : तालुक्यातील जालीहाळ ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली नसताना केवळ मतदारांना खुश ठेवण्यासाठी आपल्या गटातून दुसऱ्या गटात जावू नये म्हणून गेल्या दोन महिन्यांपासून त्यांचा खुश ठेवले जात आहे. दोन दिवसांत चक्क दिवाळीनिमित्त विविध साहित्याचे वाटप करुन मतदारांची बांधणी करुन ठेवली जात आहे. 

तालुक्यातील मुदत संपणाऱ्या 39 ग्रामपंचायतीपैकी 20 ग्रामपंचायतीचा टप्पा नुकताच पार पाडला. राहिलेल्या 19 ग्रामपंचायतीमध्ये या ग्रामपंचायतीचा समावेश असून या ग्रामपंचायतीची निवडणूक डिसेंबर अखेर होवू शकते. यापुर्वी एकाच वार्डातून निवडणूक येवून पुन्हा सरपंचदासाठी घोडाबाजार चालत होता. पण थेट सरपंचपदामुळे या जागेवर निवडणूक लढविणाय्रासाठी तिन्ही वार्डावर प्रभाव असणे गरजेचे असल्याने दोन महिन्यांपासून या गावात निवडणुकीची बांधणी करण्यात आली. मतदाराच्या व संभाव्य उमेदवाराच्या अडचणी सोडवण्यास मदतही केली. दोन गटात होणाऱ्या या निवडणूकीतील उमेदवार निश्‍चीत करुन आर्थिक दृष्टया सक्षम नसलेल्यांना आर्थिक मदत देवू करुन मतदारांचीही बांधणी करण्यात आली.

सध्या दिवाळीच्या निमित्ताने येथील दोन्ही गटाकडून साखर, गरा, पोहे, दाळसह आणखी काही संसारोपयोगी साहित्याचे वाटप करुन मतदारांशी जवळीक निवडणुक जाहीर झाली नसताना साधली जात आहे. तालुक्यातील दुष्काळी 35 गावातील हे गाव असून जिरायत क्षेत्र असलेल्या गावातील लोकांचा शेतीबरोबर ऊस तोडणी करणाऱ्यांची संख्या देखील जास्त अशा गावात गेल्या दोन महिन्यांपासून निवडणूकीच्या निमित्ताने गटांच्या बांधणीसाठी होणारा खर्च लाखो रुपयात होत असून निवडणूक होईपर्यंत येथील खर्चाची मात्र तालुक्यात चर्चा होत आहे.

Web Title: Solapur news gram panchayat election in Mangalwedha