इंद्रायणी एक्‍स्प्रेस चार महिने रद्द

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 ऑक्टोबर 2017

सोलापूर - वाशिंबे ते जेऊर स्थानकादरम्यान ट्रॅकच्या कामासाठी वाहतूक ब्लॉक करण्यात येणार असल्याने पुणे- सोलापूर प्रवासासाठी अनेकांची पसंती असणारी इंद्रायणी एक्‍स्प्रेस येत्या 1 नोव्हेंबरपासून 125 दिवसांकरिता रद्द करण्यात आली आहे.

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील दौंड ते कुर्डुवाडी या सिंगल लाइन लोहमार्गावर वाशिंबे आणि जेऊरदरम्यान ट्रॅकचे काम सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी 1 नोव्हेंबरपासून चार महिने रोज एक तास 45 मिनिटांचा वाहतूक ब्लॉक असणार आहे. या काळात चार रेल्वे रद्द, तर चार रेल्वे अंशतः रद्द करण्यात येणार आहेत.

सोलापूर ते पुणे दरम्यान दैनंदिन धावणाऱ्या इंद्रायणी एक्‍स्प्रेसचा दोन्ही बाजूंनी रद्द केलेल्या गाडीत समावेश आहे. त्याचसोबत साईनगर- पंढरपूर- साईनगर ही आठवड्यातून तीन दिवस धावणारी गाडीही या कालावधीत दोन्ही बाजूंनी रद्द करण्यात आली आहे. अमरावती- पुणे ही आठवड्यातून दोन वेळा धावणारी रेल्वे 1 नोव्हेंबरपासून चार महिन्यांकरिता एक तास उशिराने धावणार आहे.

Web Title: solapur news indrayani express 4th month close