कारागृहातील ३८ कैदी करताहेत रोजे, आवश्‍‍यक सुविधा उपलब्‍ध

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 जून 2017

सोलापूर - एकीकडे समाजात रमजान महिन्यानिमित्त नमाज, रोजे सुरू आहेत. तर दुसरीकडे जिल्हा कारागृहातील ३८ कैदीही रोजे करीत आहेत. जिल्हा कारागृह प्रशासनाकडून त्यांना आवश्‍यक त्या सुविधा देण्यात येत आहेत.

रमजान महिन्यानिमित्त रोजा, इफ्तार, सहेरी यांचे रोजचे वेळापत्रक ठरविण्यात आले आहे. कारागृहातील या कैद्यांसाठी भोजनाची तयारी रात्री दोन वाजता सुरू करण्यात येते. पहाटे चार वाजता रोजा करणाऱ्या कैद्यांना जेवण तसेच चहा देण्यात येतो. तसेच दिवसभर त्यांना नमाज पठणासाठी पाकगृहाच्या शेजारीच असलेली बरॅक देण्यात आलेली आहे. त्या जागेत हे कैदी नमाजपठण करतात.

कैद्यांकडे असलेल्या पैशातून त्यांना फळे, साखर, शेंगा आणण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येते. यासाठी कैद्यांकडून त्यांना आवश्‍यक असलेली सामग्रीची यादी घेण्यात येते. त्यांच्या यादीनुसार आवश्‍यक पदार्थ त्यांना विकत घेण्याची सोय कारागृह प्रशासनाने करून दिली आहे. सायंकाळच्या नमाजानंतर हे कैदी रोजा सोडतात. त्या वेळी त्यांना ५.३० नंतर नमाज झाल्यानंतर भोजन उपलब्ध करून देण्यात येते. पाच वेळा नमाज पठणासाठीची सोयही कारागृहात उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ईदच्या दिवशी  असतो उत्साह
जिल्हा कारागृहात असलेले कैदी रमजान ईदच्या दिवशी पैसे गोळा करून शिरखुर्म्याचे साहित्य आणतात. शिरखुर्मा तयार करून त्याचा आस्वाद घेतला जातो. मौलवीला बोलावून सामूहिक नमाजही पठण केली जाते. रमजान ईदच्या दिवशी जिल्हा कारागृहात उत्साहाचे वातावरण असते.

Web Title: solapur news jail prisoners