'जेईई'च्या स्वरूपात बदल होणार नाही

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 मार्च 2018

सोलापूर - जेईई (मेन) परीक्षेसाठी यंदाच्या वर्षी परीक्षेच्या स्वरूपात कोणताही बदल करण्यात येणार नाही. या परीक्षेची काठीण्य पातळी मागील वर्षाप्रमाणेच असणार आहे, असे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) प्रसिद्ध केलेल्या पत्रकात सांगितले आहे. या परीक्षेत "सीबीएसई'ने जाहीर केलेल्या अभ्यासक्रमानुसारच प्रश्‍न विचारण्यात येणार आहे. प्रत्येक प्रश्‍नपत्रिकेचा संचातील प्रश्‍नांचा काठिण्य स्तर हा सारखाच असणार आहे, असे पत्रकात म्हटले आहे. यंदाच्या परीक्षेत बदल होत असल्याचे संदेश मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावरून फिरत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर "सीबीएसई'ने हा खुलासा केला आहे.
Web Title: solapur news jee no changes