कन्नड माध्यम विद्यार्थी शानदार सन्मान सोहळा संपन्न

कन्नड माध्यम विद्यार्थी शानदार सन्मान सोहळा संपन्न
कन्नड माध्यम विद्यार्थी शानदार सन्मान सोहळा संपन्न

अक्कलकोट (सोलापूर) : कर्नाटक शासनाच्या कन्नड अभिवृद्धी प्राधिकारकडून महाराष्ट्रातील कन्नड माध्यमात शिक्षण घेऊन दहावी व बारावीला आपापल्या प्रशालेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोथरूडच्या आमदार मेधा कुलकर्णी होत्या.

शकुंतला जगन्नाथ शेट्टी सभागृह (एरंडवणे, पुणे) येथे संपन्न झाला. प्रारंभी गोना स्वामी आणि पुष्पा आराध्ये यांच्याकडून सांस्कृतिक व जानपद गीतांची मेजवानी दिली गेली. या समारंभाची सुरुवात मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक कन्नड अभिवृद्धी प्राधिकारचे सचिव के. मुरलीधर यांनी केले.

यावेळी बोलताना मेधा कुलकर्णींनी त्यांचे संपूर्ण मनोगत कन्नड मधूनच व्यक्त केले आणि आपले आई व वडील हे कन्नड चांगले बोलतात आणि त्यांचे वास्तव्य हे कर्नाटकातच होते असे सांगितले. आमचे कुलदैवत कर्नाटकातच आहे असे सांगून कन्नड व मराठी भाषिक हे बंधुभावाने राहतात आणि कन्नड बांधवाना काही गरज लागल्यास या मराठी बहिणीला आपण अवश्य हाक द्या, असे आवाहन करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत उपस्थित कन्नड बांधवांची मने जिंकली.

महाराष्ट्रात कन्नड माध्यमाच्या शिक्षणाला प्राधान्य दयावे आणि गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहान दयावे या उद्देशाने महाराष्ट्रातील कन्नड माध्यमातील शाळा आणि महाविद्यालयातील दहावी व बारावीतील प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना हे पारितोषिक वितरित केले गेले. हा कार्यक्रम श्री ष. ब्र. श्रीकंठ शिवाचार्य स्वामींच्या मार्गदर्शनात आणि पुरस्कार वितरण सोहळ्याचे उद्धघाटन या मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी विदयार्थ्यांना कन्नड वरिष्ठ साहित्यिक सुकन्या मारुती यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाचा उद्देश कन्नड माध्यम विद्यार्थी प्रतिभा ओळखून त्यांना प्रोत्साहित करणे व त्यांच्यात सौहार्दयाचे वातावरण निर्माण करणे हा आहे. महाराष्ट्राप्रमाणेच तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ व गोवा आदी राज्यातील कन्नड माध्यम विद्यार्थ्यांचा असाच सन्मान सोहळा दरवर्षी असा घेतला जातो. यावेळी डॉ. शशिकला गुरुपूर, प्रकाश जैन, कुशाल हेगडे, कृष्णकांत पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती. कन्नड अभिवृद्धी प्राधिकारचे अध्यक्ष प्रा. एस. जी. सिद्धरामय्या यांचे प्रस्ताविक झाले. गेल्या सहा वर्षात दहावी व बारावीच्या एकूण १८५८ विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले आहे. या कार्यक्रमास पुरस्कार प्राप्त कन्नड विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

यावेळी नगरसेविका मंजुश्री काडीकर, रामचंद्र पुजारी, बलजीत शेट्टी, रामदास आचार्य, चंद्रहास शेट्टी, इंदिरा सालीयान, एन. आर. कुलकर्णी आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संयोजन कन्नड संघ पूणे, चंद्रकांत हारकूडे मुख्याध्यापक पुणे कन्नड शाळा, कन्नड प्राधिकार अधीक्षक राजशेखर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोनू स्वामी यांनी केले तर आभार चंद्रकांत हारकूडे यांनी मानले

३२८ विद्यार्थ्यांच्या सन्मान
महाराष्ट्रातील मार्च २०१७ च्या कन्नड माध्यमाच्या शाळांतील दहावी व बारावीच्या परीक्षेत गुणवत्ताप्राप्त एकूण दहावी २७० व बारावी ५८ असे एकूण ३२८ विद्यार्थ्यांच्या सन्मान करण्यात आला. त्यात प्रथम क्रमांक १२ हजार, द्वितीय क्रमांक ११ हजार, तृतीय क्रमांक १० हजार तसेच त्यांच्या तालुक्यापासून पुणेपर्यंत विद्यार्थी व त्याच्या सोबतच्या दोघांचे प्रवास खर्च दिले गेला तसेच यापुढे कर्नाटक बाहेरच्या राज्यात दहावीपर्यंत कन्नड माध्यमात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढे कर्नाटकात शिक्षण व नौकरीत ५ टक्के आरक्षण देखील दिले जाणार आहे. यामुळे महाराष्ट्रात कन्नड माध्यमात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे, अशी माहिती कार्यदर्शी के. मुरळीधर यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com