वाहनांची 25 किलोमीटर रांग! सोलापूर-करमाळा-अहमदनगर महामार्ग ठप्प

अण्णा काळे
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

हा महामार्ग दक्षिण - उत्तर भारतातील राज्यांना जोडणारा आहे.

करमाळा : करमाळा -अहमदनगर महामार्गावर रविवारी सकाळी दहा वाजल्यापासून मोठी वहातुक ठप्प झाली आहे. त्यामुळे टेंभुर्णीपासून करमाळ्याकडे साधारणपणे 20 ते 25 किलोमीटर वहानांच्या रांगा लागल्या आहेत. 

या महामार्गाचे अहमदनगर ते टेंभुर्णी हे काम गेली चार वर्षापासुन रखडले आहे. जोगोजागी मोठे खड्डे पडले आहेत. हा महामार्ग दक्षिण - उत्तर भारतातील राज्यांना जोडणारा आहे. या महामार्गावरून मोठ्या प्रमाणावर जड वाहतूक होते .या महामार्गाचे काम रखडलेल्याने नेहमीच वाहतूक कोंडी होते.

रस्तावर सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार यांच्याकडून खड्डे बुजवण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. मंगळवारी (ता. 31 ) रोजी कार्तिक एकादशी निमित्त पंढरपूरला येण्यासाठी विदर्भ, मराठवाडा, खानदेश, नाशिक,अहमदनगर या भागातून भाविक याच महामार्गने येतात. या वहातुक कोंडी मुळे पंढरपूरला येणा-या एस.टी गाड्या सकाळपासून अडकून पडल्या आहेत.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: solapur news karmala nagar road traffic jam 25 km vehicle queue