एसटी खड्ड्यात गेल्याने सहा प्रवाशी गंभीर जखमी

वैभव गाढवे
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

कुर्डुवाडीवरून करमाळ्याकडे येत असलेले कमलाभवानी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक देवराव लोकरे यांनी आपली गाडी थांबवून एस.टी.तील प्रवाशाना बाहेर काढले.

करमाळा : राज्य परिवहन महामंडळाची करमाळा - कुर्डुवाडी बस सकाळी साडेदहाच्या सुमारास फिसरे (ता. करमाळा) जवळ रस्ता सोडून खड्ड्यात गेल्याने सहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये चालक व वाहक या दोंघाचाही समावेश आहे. अपघात घडल्याच्या ठिकाणापासुन फक्त दहा फुट अंतरावर अंरूद पुल आहे. त्यामुळे मोठा अपघात टळला आहे.  

रविवारी (ता. 5 नोव्हेंबर रोजी) करमाळा आगारातून सकाळी दहा वाजताची करमाळा-कुर्डुवाडी एस. टी. (एम. एच. 20, बीएल 0164) फिसरेपासुन अर्धा किलोमीटर अंतरावर असताना समोरून वेगाने आलेल्या भुम-बोरवली बसला अपघात होऊ नये म्हणून चालक प्रयत्न करत असताना बसवरील ताबा सुटुन बस रस्तासोडून खड्ड्यात गेली. खड्डा मोठा असल्याने बसचे नुकसान झाले आहे. बसमधील 16 प्रवाशापैंकी 6 प्रवाशी गंभीर जखमी झाले. तर 8 जण किरकोळ जखमी झाले आहेत. खड्ड्याच्या बाजुन दाट झाडी असल्याने प्रवाशांना काचा फोडुन बाहेर काढण्यात आले.

यावेळी कुर्डुवाडीवरून करमाळ्याकडे येत असलेले कमलाभवानी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक देवराव लोकरे यांनी आपली गाडी थांबवुन एस.टी.तील प्रवाशाना बाहेर काढले. यावेळी जखमी प्रवाशाना कमलाभवानी शुगरच्या गाडीने तात्काळ उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आला आहे. अपघातात शांताबाई काशीनाथ कांबळे (वय 65), आसराबाई संजय कांबळे (वय 37) दोघी  रा. जवळा, ता. जामखेड, जि. अहमदनगर, पार्वती पंढरीनाथ मेहेर (वय 60 ), रा. कोर्टी, ता. करमाळा शुभम भारत ढावरे वय 17 रा. फिसरे, चालक मुल्लीकानात पिराप्पा गवंडी (वय 30)रा. अक्कलकोट, जि. सोलापुर, वहाक चंद्रकांत बनसोडे (वय 24 ) रा. नांदेड हे जखमी झाले आहेत.
घटनास्थळी सहाय्यक आगारप्रमुख गुरूनाथ रणे, वहातुक नियंञक के. डी. मुसळे यांनी भेट दिली आहे.  जखमींना एस. टी महामंडळाकडून 1 हजार रुपये तात्पुरती मदत करण्यात आली आहे.  

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: solapur news karmala state transport bus accident