'केएसआरटीसी'ची प्रवास सवलत योजना

राजशेखर चौधरी
रविवार, 24 सप्टेंबर 2017

सोलापूर आगारातून अक्कलकोट, बार्शी, तुळजापूर, पंढरपूर, मंगळवेढा, अकलूज या व इतर मार्गावर ही योजना फायदेशीर ठरू शकते आणि एसटीला सुद्धा परतीच्या प्रवासाला प्रवाशांची हमी सुद्धा मिळून भारमान वाढू शकते. कर्नाटकात आवश्यक जिल्ह्यासह शेजारी कलबुरगी जिल्ह्यात ही प्रवास सवलत योजना चालू आहे.

अक्कलकोट : 'केएसआरटी'ने कर्नाटकातील जिल्हास्तरावरून ज्या मार्गावर जास्त प्रवाशी असतात पण एस. टी. ला उत्पन्न कमी मिळत असते. त्या मार्गावरील प्रवाशी महामंडळाकडे खेचण्यासाठी काही मुख्य मार्गावर प्रवाशांनी जातानाच येतानाचेही तिकीट काढल्यास प्रत्येक तिकीटामागे सवलत योजना अनेक दिवसांपासून चालू आहे. त्यामुळे प्रवाशी अवैध वाहतुकीकड़े न वळता एसटीच्या सुरक्षित वाहतुकिकडे वळावे आणि महामंडळाच्या उत्पन्नात भर पडावी हा उद्देश ठेवण्यात आला आहे. अशी योजना महाराष्ट्रात जिल्हास्तरावरून मुख्य व वर्दळीच्या मार्गावर चालू केल्यास प्रवाशी एसटी कडे खेचले जाऊन उत्पन्न वाढू शकेल.

सोलापूर आगारातून अक्कलकोट, बार्शी, तुळजापूर, पंढरपूर, मंगळवेढा, अकलूज या व इतर मार्गावर ही योजना फायदेशीर ठरू शकते आणि एसटीला सुद्धा परतीच्या प्रवासाला प्रवाशांची हमी सुद्धा मिळून भारमान वाढू शकते. कर्नाटकात आवश्यक जिल्ह्यासह शेजारी कलबुरगी जिल्ह्यात ही प्रवास सवलत योजना चालू आहे. या योजनेला प्रवाश्यांचा वाढता प्रतिसाद मिळतो आहे. कलबुरगी येथून आळंद, जेवर्गी, शहापूर, सूरपूर, सेडम, चितापूर, शहाबाद, हुमानाबद, बिदर आदी शहरांसाठी ही प्रवासी सवलत योजना चालू आहे.

कलबुरगी ते आळंद ४५ किलोमीटर अंतर असून प्रति व्यक्ती एकेरी भाडे ४८ रुपये आहे तर दुहेरी भाडे होईल ९६ रुपये पण अगोदरच जाणे आणि येणे असे तिकीट एकदम काढल्यास फक्त ८० रुपये घेतके जाते म्हणजेच १६ रुपये सवलत देण्यात आली आहे. त्याशिवाय कलबुरगी पासून जेवर्गी एकेरी भाडे ४० रुपये आहे तर दुहेरी भाडे होईल ८० रुपये तर सवलतीत ६५ रुपये भाडे आहे. म्हणजे त्यात १५ रुपयाची बचत आहे. कलबुरगी पासून शहापूर एकेरी भाडे ७० रुपये आहे तर दुहेरी भाडे होईल १४० रुपये तर सवलतीत ११५ रुपये भाडे आहे म्हणजे त्यात २५ रुपयाची बचत आहे.कलबुरगी पासून सूरपूर एकेरी भाडे १०१ रुपये आहे तर दुहेरी भाडे होईल २०२ रुपये तर सवलतीत १५० रुपये भाडे आहे म्हणजे त्यात ५२ रुपयाची बचत आहे. कलबुरगी पासून सेडम एकेरी भाडे ६० रुपये आहे तर दुहेरी भाडे होईल १२० रुपये तर सवलतीत ९६ रुपये भाडे आहे म्हणजे त्यात २४ रुपयाची बचत आहे.कलबुरगी पासून बिदर एकेरी भाडे ११३ रुपये आहे तर दुहेरी भाडे होईल २२६ रुपये तर सवलतीत २१० रुपये भाडे आहे म्हणजे त्यात १६ रुपयाची बचत आहे.कलबुरगी पासून चितापूर एकेरी भाडे ४९ रुपये आहे तर दुहेरी भाडे होईल ९८ रुपये तर सवलतीत ७६ रुपये भाडे आहे म्हणजे त्यात २२ रुपयाची बचत आहे.कलबुरगी पासून शहाबाद एकेरी भाडे ५६  रुपये आहे तर दुहेरी भाडे होईल ११२ रुपये तर सवलतीत १०० रुपये भाडे आहे म्हणजे त्यात १२ रुपयाची बचत आहे.कलबुरगी पासून हुमनाबाद एकेरी भाडे ६०  रुपये आहे तर दुहेरी भाडे होईल १२० रुपये तर सवलतीत १०५ रुपये भाडे आहे म्हणजे त्यात १५ रुपयाची बचत आहे.

कर्नाटक राज्य परिवहन मंडळाने सुरू केलेली प्रवाशी व एसटी या दोघांच्या फायद्याची व सुरक्षेची योजना महाराष्ट्र एसटी मंडळाने सुरू करावी व अवैध प्रवाशी वाहतूक रोखावी आणि महामंडळाच्या उत्पन्नात भर टाकावी.
- काशिनाथ कळवंत, जेऊर ता.अक्कलकोट

Web Title: Solapur news KSRTC bus service