कुलभूषण जाधवांच्या सुटकेसाठी आई-वडिलांचे देवांना साकडे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जुलै 2017

सोलापूरः पाकिस्तानच्या न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेले भारताचे माजी लष्करी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुखरूप सुटकेसाठी त्यांच्या आई-वडिलांनी सोलापूर, पंढरपूर व तुळजापूर येथील देव-देवतांना साकडे घातले. सोलापुरातील डॉ. द्वारकानाथ कोटणीस स्मारकासही त्यांनी भेट दिली.

जाधव यांच्या आई अवंती जाधव आणि वडील तथा सेवानिवृत्त सहा. पोलिस आयुक्त सुधीर जाधव यांनी सोमवारी (ता. 17) सकाळी श्री तुळजाभवानीच्या दर्शनानंतर पंढपूरला जाऊन आपला मुलगा सुखरूप मायदेशी यावा असे साकडे श्री पांडुरंगाला आणि रुक्‍मिणी मातेला घातले. आज (मंगळवार) सकाळी अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मंदिरात दर्शन घेऊन सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांचे दर्शन घेतले. कुलभूषण सुखरूप परत यावा, असे साकडे घातले.

भारत सरकारने आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण यांच्या फाशीला स्थगिती मिळवली आहे. हाच निर्णय कायम रहावा आणि आपला मुलगा परत यावे हीच आस घेऊन हे माता पिता देवाच्या दारी जात आहेत. जाधव दांपत्यांनी आज सकाळी माजी पोलिस उपायुक्त अकबर मुजावर, दुसरे मित्र डॉ. शीतलकुमार शहा आणि रमेश मोहिते यांची सोलापुरात भेट घेतली. आमदार प्रणिती शिंदे यांनीही त्यांची भेट घेतली.

प्रसार माध्यमांशी आम्ही बोललो तर त्याचे अनेक अर्थ काढले जातील व कुलभूषण अडचणीत येईल, असे अवंती जाधव यांनी सांगितले. तर, कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी संपूर्ण देश जाधव कुटुंबियांच्या पाठीशी असल्याचे आमदार शिंदे यांनी यावेळी सांगितले.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :

Web Title: solapur news kulbhushan jadhav's family in pandharpur and tuljapur