उपचारांसाठी कर्नाटकात गेलेल्या गाडीचा अपघात; 6 मृत्युमुखी

किरण चव्हाण
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

या अपघातात माढा तालुक्यातील दारफळ येथील तीनजण व उपळाई खुर्द येथील एकजण यांच्यासह एकूण  सहाजण ठार झाले आहेत.

माढा (जि. सोलापूर) : औषोधपचारासाठी कर्नाटक राज्यातील शिमोगा येथे गेलेल्या दारफळ सिना (ता. माढा) येथील क्रुझर गाडी आणि बसची धडक होऊन सहाजण मृत्युमुखी पडले. 

विजापूर हुबळी रोडवर आज कोर्सी (ता. बेळगी, जिल्हा बागलकोट) येथे क्रुझर (एमएच 45 एन 4327) सकाळी कर्नाटक परिवहन बसला धडक बसून हा अपघात झाला. या अपघातात माढा तालुक्यातील दारफळ येथील तीनजण व उपळाई खुर्द येथील एकजण असे एकूण सहाजण ठार झाले आहेत.

सोलापूर येथील दोन जण ठार झाल्याचे समजते. दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर बागलकोट येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांमधे दोन महिला व चार पुरूषांचा समावेश आहे.'

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
सदाभाऊ यांचा अखेर 'सवतासुभा'
इनक्‍युबेटरचा सरसकट वापर अनावश्‍यक
ओडिशात आघाडी करणार नाही: अमित शहा
फिरोज, ताहीर यांना फाशीची शिक्षा
श्रुती बडोले यांनी शिष्यवृत्ती अर्ज घेतला मागे
उच्चशिक्षण क्षेत्रासमोरच्या आव्हानांवर चिंतन
बैलांच्या शर्यतींबाबतचा मसुदा अंतिम टप्प्यात
तरंगत्या सौर पॅनेलद्वारे 'उजनी'वर ऊर्जानिर्मिती शक्‍य
हिंसाचाराला "डेरा'चे आर्थिक पाठबळ
कोमलला मिळाले मदतीचे ‘हृदय’

Web Title: solapur news madha karnataka accident four dead