दमाणी-पटेल पुरस्काराचे देवी व अनासपुरे मानकरी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 मार्च 2018

सोलापूर : यंदाचा दमाणी-पटेल प्रतिष्ठानच्या कर्मयोगी पुरस्कार पद्मश्री डॉ. गणेश देवी व अभिनेते मकरंद अनासपुरे यांना जाहीर झाला आहे, अशी माहिती प्रेमरतन दमाणी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सोलापूर : यंदाचा दमाणी-पटेल प्रतिष्ठानच्या कर्मयोगी पुरस्कार पद्मश्री डॉ. गणेश देवी व अभिनेते मकरंद अनासपुरे यांना जाहीर झाला आहे, अशी माहिती प्रेमरतन दमाणी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

साहित्य, कला आणि क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान आहे, अशांना दमाणी-पटेल प्रतिष्ठानतर्फे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी कर्मयोगी पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह व एकावन्न हजार रुपये रोख असे आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. हा सोहळा गुरुवारी (ता. 29) सायंकाळी सात वाजता डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात होणार आहे.

Web Title: solapur news makrand anaspure dr ganesh devi award