20 वर्षांपासून दुर्लक्षित आहे दोन गावांना जोडणारा रस्ता

हुकूम मुलाणी
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

हिवरगाव येथील विदयार्थ्यी माध्यमिक व महाविदयालयीन शिक्षणासाठी येताना हा रस्ता खराब असल्याने त्यांना तीन किमी दुसरीकडून जावे लागत आहे.

मंगळवेढा : हिवरगाव -भाळवणी या दोन गावाला जोडणारा रस्ता तब्बल तीस वर्षापासून अर्धवट असून या रस्त्याच्या पुर्तर्तेकडे संबधित खात्यानेही लक्ष दिले नाही सध्या या रस्त्यावरच गवत उगवल्याने रस्ता आहे की शेत असा प्रश्‍न या रस्त्यावरुन जाणा येणाय्राला पडला आहे. त्यामुळे या परीसरातील जनतेमधून संताप व्यक्त केला जात असून हा रस्त्याच्या अर्धवट काम पुर्ण करण्याबरोबर या दुरुस्तीची मागणी होत आहे.

या रस्त्यावरील खडी विस्कटलेली असून काही ठिकाणी खडडे पडले आहे.या रस्त्यावरुन ये-जा करणाय्रानी लगत शेतकय्रांच्या शेतातून रस्ता तयार केल्याने या शेतकय्रांच्या शेतीचेही नुकसान होत आहे. हिवरगाव येथील विदयार्थ्यी माध्यमिक व महाविदयालयीन शिक्षणासाठी येताना हा रस्ता खराब असल्याने त्यांना तीन किमी दुसरीकडून जावे लागत आहे. यासाठी वेळेबरोबर आर्थिक खर्चाचा भार देखील सोसावा लागत आहे.या रस्त्यावरच फिरंगीचे झाडे देखील वाढली आहे.

सध्या या रस्त्यावर दोन ठिकाणी लहान पुलाची आवश्यकता आहे.प्लॅनमध्ये नसल्याचे कारण सांगून जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाने अदयापही दुरुस्ती व देखभाल देखील केली नाही. सध्या परतीच्या पावसाने रस्त्यावरुन पाणी वाहत असून त्या ठिकाणी असलेल्या खडयाच्याा अंदाजही येत नसल्याने गैरसोय होत आहे. या रस्त्याच्या दुरुस्ती व दोन पुलासाठी 15 लाखाच्या निधीची मागणीचे अंदाजपत्रक तयार करण्यात आल्याचे जि.प.बांधकाम च्या मंगळवेढा कार्यालयातून सांगण्यात आले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: solapur news mangalvedha roads issue ignored