मंगळवेढा: निम्याहून अधिक ग्रामसभा होणार ग्रामसेवकाविना

हुकूम मुलाणी
शुक्रवार, 26 जानेवारी 2018

मंगळवेढा (सोलापूर) : शासकीय सणादिवशी होणाऱया ग्रामसभेस ग्रामसेवक वगळता अन्य विभागाचे कर्मचारी गैरहजर असल्याने जनतेच्या रोषाला ग्रामसेवकाला समोरे जावे लागत असल्याने आज (शुक्रवार) होणाऱया ग्रामसभेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ग्रामसेवक संघटना (डी.एन.ए 136)ने घेतला असून, यामुळे तालुक्यातील निम्याहून अधिक ग्रामसभा या ग्रामसेवकाविना होणार आहेत.

मंगळवेढा (सोलापूर) : शासकीय सणादिवशी होणाऱया ग्रामसभेस ग्रामसेवक वगळता अन्य विभागाचे कर्मचारी गैरहजर असल्याने जनतेच्या रोषाला ग्रामसेवकाला समोरे जावे लागत असल्याने आज (शुक्रवार) होणाऱया ग्रामसभेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ग्रामसेवक संघटना (डी.एन.ए 136)ने घेतला असून, यामुळे तालुक्यातील निम्याहून अधिक ग्रामसभा या ग्रामसेवकाविना होणार आहेत.

शासनाने निर्णयाने प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, महात्मा गांधी जयंती या दिवशी प्रत्येक गावात ग्रामसभांचे आयोजन करण्यात येते. यामध्ये विकासकामांचे नियोजन, धोरणात्मक निर्णय घेणे अपेक्षित असताना दुर्दैवाने मागील काही काळात या विशेष ग्रामसभा राजकीय आखाडा बनल्या आहेत. त्याचा सर्वात मोठा फटका ग्रामसेवक संवर्गास बसत आहे. सदर दिवशी सार्वजनिक सुटी असतानाही ग्रामसेवक संवर्ग सुटीचा त्याग करून कामकाज करीत असतो. परंतु, यावेळी ग्रामसेवकांना होणारा त्रास पाहता या दिवशी होणार.

या ग्रामसभा अन्य दिवशी घेण्याची गरज आहे, मात्र, या दिवशी सार्वजनिक सुटी असल्याने ग्रामसेवक वगळता इतर संबंधित विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित नसल्याने जनतेनी विचारलेल्या प्रश्‍नाचे समाधानकारक उत्तर न मिळाल्याने यावेळी दप्तरांची पळवापळवी, प्रोसेडिंग रजिस्टर फाडणे, हाणामारी, ग्रामसेवकांना दमदाटी, जीवे मारण्याच्या धमक्या देणे, खोटे गुन्हे दाखल करणे असे प्रकार होतात त्यामुळे अशा राष्ट्रीय सणाऐवजी अन्य दिवशी ग्रामसभा घ्याव्यात त्याची आजपासून अंमलबजावणी करावी अन्यथा प्रजासत्ताक दिनाच्या ग्रामसभेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा यापुर्वीच दिला ग्रामसभांच्या दिवशी पुरेसे पोलिस संरक्षण उपलब्ध करून देण्याची मागणीही या युनियनने केली.

अन्य विभागाच्या प्रश्‍नाबाबत संबधित कर्मचारी गैरहजर असल्याने जनतेच्या रोषाला ग्रामसेवकाला सामोरे जावे लागत आहे, शासकीय सुटटीऐवजी अन्य दिवशी ग्रामसभा घेतली जावी.
- संजय शिंदे अध्यक्ष ग्रामसेवक संघटना.

या दिवशी ग्रामसभा घेणेबाबत शासनाचे निर्देश आहेत संपावर न जाण्याबाबत ग्रामसेवकाला सुचना दिल्या आहेत, तरीही मुख्याध्यापकाच्या मदतीने या ग्रामसभा पुर्ण घेतल्या जातील जनतेची गैरसोय होणार नाही.  
- राजेद्रकुमार जाधव, गटविकास अधिकारी मंगळवेढा.

Web Title: solapur news mangalwedha gram sabha and gram sevak