'सकाळ'मध्ये वृत्त प्रसारित होताच काढले हजेरीपत्रक

हुकूम मुलाणी
गुरुवार, 18 जानेवारी 2018

मंगळवेढा (सोलापूर): महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामासाठी पंचायत समितीकडे पुरेशे मनुष्यबळ नसल्याने मागणी केलेल्या मजुराला काम व हजेरीपत्रक मिळत नसल्यामुळे वृत्त आज (गुरुवार) 'सकाळ'मध्ये प्रसिद्ध होतात मजुरांनी मागणी केलेल्या 50 पेक्षा अधिक हजेरीपत्रक तहसील कार्यालयातील ऑपरेटरच्या माध्यमातून काढण्यात आली.

तालुक्यात सध्या प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेची 1100 पेक्षा अधिक कामे सुरू आहेत. ती कामे मार्च अखेर पुर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाने केले असून या घरकुलाच्या कामात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून 18 हजार पेक्षा अधिक रकमेचे अनुदान देण्यात येते. या कामावरील नियोजनासाठी असलेल्या सहायक कार्यक्रम अधिकारी याची बदली केल्याने सांगोला येथे या योजनेचे काम सुरू नसल्यामुळे तेथील सहायक कार्यक्रम अधिकारी यांना सांगोला व मंगळवेढ्याचा पदभार दिला. दोन्ही तालुक्यात तीन-तीन दिवस काम केले जात आहे. शिवाय ऑपरेटर नसल्यामुळे हजेरी पत्रक निघत नाही नवीन जॉब कार्ड देखील मिळत नाही. रोजगार सेवक मानधनही थांबले आहे.

गेल्या दोन वर्षापासून या योजनेतून वैयक्तीक लाभाच्या योजना थांबल्यामुळे व या कामातील मजूरी कमी आणि अवेळी असल्यामुळे केंद्र शासनाची योजना तालुक्यात अंतीम घटका मोजत आहे म्हणून. पंचायत समितीसाठी स्वतंत्र सहायक कार्यक्रम अधिकारी व ऑपरेटर ची नियुक्ति करावी जेणेकरुन मार्च अखेर शासनाने या योजनेसाठी ग्रामपंचायत, कृषी, सामाजिक वनीकरण, या खात्यासाठी निश्चित केलेले उद्दिष्ट पुर्ण होईल.

Web Title: solapur news mangalwedha rojgar hami yojana