संप मागे घेण्याचे सहकारमंत्र्यांचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 जून 2017

सोलापूर - शेतकऱ्यांच्या आंदोलनाला विरोधक फूस लावण्याचे षडयंत्र करत असून कर्जमाफी आणि हमीभावाबाबत सरकार सकारात्मक असल्याचे सांगत शेतकऱ्यांनी संप मागे घ्यावा असे आवाहन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केले आहे.

देशमुख यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस सरकारने केलेले साठ वर्षांचे पाप धुण्यास वेळ लागणार असल्याचे सांगत दोन्ही कॉंग्रेसवर निशाणा साधला. "सध्या अनेकांची दुकानदारी बंद झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आडून डाव साधत आहे. मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांची जाणीव आहे. सरकार खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. चर्चेसाठी सर्व शेतकरी संघटना आणि प्रतिनिधींसाठी सरकारची दारं खुली असून शेतकऱ्यांनी संप मागे घ्यावा', असे आवाहन देशमुख यांनी यावेळी केले. अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी समिती स्थापन केली असल्याचेही त्यांनी सांगितलं. "शेतकऱ्यांच्या मालाची नासाडी कोणाच्याही हिताची नाही. नासाडी न करता अन्न गोरगरिबांना वाटा. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांबाबत सरकार संवेदनशील आहे. भाजपचे प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या दारात जाऊन संप मागे घेण्याचे आवाहन करणार आहेत', असेही देशमुख यांनी सांगितले.

Web Title: solapur news marathi news maharashtra news subhash deshmukh farmer strike