माकडामुळे फुटली महापौरांच्या मोटारीची काच

विजयकुमार सोनवणे
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

पालकमंत्री विजय देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त विणकर बागेत कार्यक्रम होता. या कार्यक्रमास देशमुख यांच्यासह महापौर शोभा बनशेट्टी आणि भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर देशमुख तेथून गेले.

सोलापूर : "कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच गाठ पडली' अशी म्हण प्रचलित आहे. त्याच धर्तीवर "माकड बसायला आणि फांदी तुटायला एकच गाठ पडली' आणि महापौरांच्या मोटारीची काच भंगली. ही घटना शनिवारी घडली.

पालकमंत्री विजय देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त विणकर बागेत कार्यक्रम होता. या कार्यक्रमास देशमुख यांच्यासह महापौर शोभा बनशेट्टी आणि भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर देशमुख तेथून गेले. त्यानंतर काही वेळाने महापौरही निघाल्या. दरम्यान, त्यांचे शासकीय वाहन ज्या झाडाच्या खाली थांबले होते, त्या झाडाच्या फांदीवर माकड बसले आले.

वाहनाच्या बरोबर वरच्या बाजूला असलेल्या फांदीवर माकड बसले आणि ती फांदी तुटली, त्यामुळे माकड थेट वाहनाच्या समोरच्या काचेवर आदळले. त्यामुळे काच दुभंगली आणि काचेला तडाही गेला. मोठा आवाज झाल्याने माकड पळून गेले. या घटनेची  विणकर बागेत जमलेल्या कार्यकर्त्यांत  उशिरापर्यंत शनिवारी मारुतीने दर्शन दिले अशी चर्चा रंगली होती.

Web Title: Solapur news mayor car in solapur

टॅग्स