सोलापूरच्या  आजी- माजी महापौरांत कलगीतुरा 

विजयकुमार सोनवणे
गुरुवार, 18 जानेवारी 2018

सोलापूर - समांतर जलवाहिनीच्या निधीवरुन महापौर भाजपच्या  शोभा बनशेट्टी आणि माजी महापौर कॉंग्रेसचे यू एन बेरीया यांच्यात कलगीतुरा रंगला आहेत. 

सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी प्रस्तावित केलेल्या योजनेला  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखविला असून २०० कोटी रुपये अनुदान देण्यासही तयारी दर्शविली आहे. त्यामुळे माजी महापौर बेरीया यांनी भाजपच्या दोन्ही मंत्र्यांच्या सत्कारासाठी तयार रहावे व पैसे गोळा करावेत असे खोचक आव्हान दिले होते.

महापौरांच्या या वक्तव्यावर बेरीया यांनी टीका केली. कॉंग्रेसच्या राजवटीत सुरु झालेल्या एनटीपीसी आणि आताच्या केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेतून निधी मिळणार आहे. ऱाज्य शासन एक पैशाचीही मदत करणार नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना हार कशासाठी, असा प्रश्‍न  बेरिया यांनी उपस्थित केला आहे. 

श्री. बेरिया म्हणाले,""समांतर जलवाहिनीसाठी महाराष्ट्र शासनाकडून निधी आणण्याचे आव्हान मी दिले होते.आता मिळणाऱ्या निधीत एनटीपीसीचे 250 कोटी, स्मार्ट सिटीतून 200 कोटी आणि महापालिकेच्या 42 कोटी रुपयांचा समावेश आहे. त्यात शासनाचा काहीच हिस्सा नाही. त्यामुळे जलवाहिनीसाठी निधी आणण्यात मंत्र्यांना अपयश आल्याचे स्पष्ट झाले आहे.'' 

सध्या शहराला तीन ते पाच दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. अजूनही शहरासाठी पाणी सोडण्यात आले नाही. जे शासन पाणी सोडण्यास विलंब करीत आहे, ते 1240 कोटी रुपये मंजूर करेल का, असा प्रश्‍नही श्री. बेरिया यांनी या वेळी उपस्थित केला. 

एनटीपीसी व स्मार्ट सिटी योजनेतून निधी मिळणार का नाही याची अजून कोणालाच खात्री नाही. मात्र त्यावरून आजी- माजी महापौरामध्ये रंगलेल्या कलगीतुर्याची चर्चा मात्र जोरदार सुरु आहे.

Web Title: solapur news mayor solapur municipal corporation