वैद्यकीय महाविद्यालयांचा 40 प्राध्यापकांना दिलासा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 मार्च 2018

सोलापूर - डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 40 प्राध्यापकांना दिलासा मिळाला आहे. या प्राध्यापकांच्या नियुक्ती रद्द करण्याच्या सहा मार्च रोजीच्या निर्णयास शासनाने स्थगिती दिली आहे.

सोलापूर - डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 40 प्राध्यापकांना दिलासा मिळाला आहे. या प्राध्यापकांच्या नियुक्ती रद्द करण्याच्या सहा मार्च रोजीच्या निर्णयास शासनाने स्थगिती दिली आहे.

शासकीय वैद्यकीय रिक्त पदावर अधिव्याख्याता म्हणून निवड करण्याचे अधिकार अधिष्ठातांना देण्यात आले होते. सहा मार्च रोजीच्या शासन निर्णय अधिष्ठातांचे हे अधिकार रद्द करण्यात आले होते. ही पदे वैद्यकीय संचालनालयाच्या माध्यमातून भरली जाणार होती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून रिक्त पदे भरण्या ऐवजी तात्पुरत्या स्वरूपावर ही पदे भरली जात होती. सहा मार्चच्या निर्णयामुळे 40 अधिव्याख्यात्यांची नियुक्ती रद्द करण्याचा शासनाचा विचार होता.

महाराष्ट्र स्टेट मेडिकल टीचर्स असोसिएशनच्या सदस्यांनी मुंबई येथे जाऊन वैद्यकीय शिक्षण विभागास भेट देऊन हा निर्णय मागे घेण्याची विनंती केली होती. संघटनेची ही विनंती मान्य करण्यात आली असून, नियुक्ती रद्द करण्याच्या निर्णयास पुढील आदेश येईपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे.

Web Title: solapur news medical college professor