उत्पादकांना 27 रुपये द्यावेच लागतील 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

सोलापूर -  सरकारने गाईच्या दुधाला प्रतिलिटर 27 रुपये देण्याचा निर्णय 19 जूनला घेतला आहे. त्यानुसार जिल्हा दूध संघाला दूध उत्पादक शेतकऱ्यांना 27 रुपये द्यावेच लागतील. संघाकडून ते दिले जात नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना याबाबत दुसरी नोटीस देण्यात आल्याची माहिती पुणे येथील सहकारी संस्थांचे (दुग्ध) विभागीय उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांनी "सकाळ'ला दिली. 

राज्यात शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावर आंदोलन झाल्यानंतर शासनाने 19 जूनला राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देत दुधाच्या खरेदी दरात तीन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्याची अंमलबजावणी जिल्हा दूध संघाने केली नव्हती. त्यामुळे पुण्याच्या विभागीय उपनिबंधक कार्यालयाने संघाला सहा जुलैला याबाबत विचारणा करणारी पहिली नोटीस पाठविली होती. संघाने 15 जुलैला या नोटिशीला उत्तर देत दूध दरवाढ देण्यात येत असलेल्या अडचणी नमूद करून शासन निर्णयाप्रमाणे दूध दर देत असल्याचे सांगितले होते. निपटारा शुल्काच्या नावाखाली "दूध संघाकडून शेतकऱ्यांची खुलेआम लूट' असे वृत्त "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची दखल घेत विभागीय उपनिबंधकांनी याबाबत तोंडी चौकशी करण्याचा आदेश दिला होता.

Web Title: solapur news milk