सोलापूर दूध संघाकडून तीन रुपयांची "वसुली' 

संतोष सिरसट
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

सोलापूर - जिल्हा दूध संघाने दूधउत्पादक शेतकऱ्यांकडून प्रतिलिटर केली जाणारी तीन रुपयांची "वसुली' सुरूच ठेवली आहे. आता कमी गुणप्रत असलेल्या दुधाचा एक पॉइंट कमी झाल्यास त्या दुधाच्या दरामध्ये तीन रुपयांची कपात करण्याचा नवा निर्णय संघाने घेतला आहे. 

3.5 फॅट व 8.5 एसएनएफ या गुणप्रतीचे दूध स्वीकारावे, असा सरकारचा नियम आहे. या गुणप्रतीच्या दुधाबरोबरच 3.1 फॅट व 8.0 एसएनएफ या गुणप्रतीच्या वरील दूध संघाकडून स्वीकारले जाते. त्याच्या खालील गुणप्रतीचे दूध संघाकडून जप्त केले जाते. संघ मागील अनेक वर्षापासून 3.5 फॅट व 8.4 एसएनएफ गुणप्रतीच्या दूध दरामध्ये केवळ 20 पैशांची कपात करत होता. मात्र, 1 सप्टेंबरपासून हीच कपात तीन रुपयांनी सुरू केली आहे. 

यापूर्वी 3.5 फॅट व 8.5 एसएनएफ गुणप्रत असलेल्या दुधाला सरकारी निर्णयाप्रमाणे 27 रुपये दर दिला जात होता. मात्र, त्यामध्ये प्रतिलिटर तीन रुपये निपटारा शुल्काच्या नावाखाली कपात केले जात होते. आता हे तीन रुपये कमी गुणप्रत असलेल्या दुधातून "वसूल' करण्याचा निर्णय संघाने घेतला आहे. काहीही झाले तरी नुकसान दूधउत्पादक शेतकऱ्यांचेच होणार असल्याचे यावरून दिसून येते.

Web Title: solapur news milk