दुधाचे पैसे उत्पादकाच्या खात्यावर

संतोष सिरसट
बुधवार, 14 जून 2017

सोलापूर - राज्यातील प्राथमिक सहकारी दूध संस्थांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे पेमेंट थेट त्यांच्या बॅंक खात्यावर ऑनलाइन जमा करण्याचा आदेश सरकारने दिला आहे. येत्या दोन महिन्यात याची अंमलबजावणी न करणाऱ्या संस्थेवर सहायक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) यांना कारवाई करण्यासही सांगितले आहे.

राज्यात 12 हजार 299 प्राथमिक सहकारी दूध संस्था आहेत. या संस्थांच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून दूधाचे संकलन केले जाते. दूध उत्पादकांकडून दूधाचे संकलन केल्यानंतर त्यांना दर 10 दिवसांनी त्या दूधाचे पेमेंट संस्थांचे सचिव रोख स्वरुपात देतात. मात्र, यापुढे दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्यांनी संस्थेकडे घातलेल्या दूधाचे पेमेंट थेट त्यांच्या बॅंक खात्यावर जमा करण्याचा आदेश सरकारने दिला आहे. त्यामुळे दूध संस्थांनी ऑनलाइन सेवा देणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बॅंका किंवा राष्ट्रीयकृत बॅंकांमध्ये संस्थांची व 100 टक्के सभासदांची खाती उघडायची आहेत. दोन महिन्यामध्ये ही खाती उघडून घेऊन संबंधित दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्यांनी घातलेल्या दूधाचे पेमेंट थेट त्यांच्या बॅंक खात्यावर जमा करण्याची कार्यवाही संस्थांनी करायची आहे.

Web Title: solapur news Milk money on the producer's account