ऍड. ओवीसींना मानपत्र देण्याचा प्रस्ताव देणार: रियाज खरादी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 मार्च 2018

सोलापूर: एमआयएमचे संस्थापक अध्यक्ष तथा खासदार ऍड. अससुद्दीन ओवीसी यांना सोलापूर महापालिकेने मानपत्र द्यावे, असा प्रस्ताव देणार असल्याचे एमआयएमचे नगरसेवक रियाज खरादी यांनी सांगितले.

सोलापूर महापालिकेत सध्या योगगुरू रामदेवबाबा यांना मानपत्र दिल्याचे प्रकरण गाजत आहे. ठराव झाला नसतानाही त्याची कार्यवाही झाल्याने सत्ताधारी भाजपमधील पक्षनेते व नगरसेवकांनीच महापौर व इतर नगरसेवकांना घरचा आहेर दिला आहे. आज (मंगळवार) महापालिकेच्या सभेत या विषयावर एमआयएमतर्फे लक्षवेधी उपस्थित केली जाणार होती. मात्र, सभा तहकूब झाल्याने विषय श्री. खरादी यांना विषय मांडता आला नाही.

सभा तहकूब झाल्यावर श्री. खरादी यांनी पत्रकारांना प्रस्ताबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, "ऍड. ओवेसी यांना आदर्श खासदार म्हणून गौरविण्यात आले आहे. हैदराबादमध्ये एमआयएमच्या वतीने रुग्णालये चालविली जातात. अनेक समाजोपयोगी कामे केली जातात. त्याचा लाभ कोट्यवधी भारतीयांना झाला आहे. त्याची दखल घेऊन सोलापूर महापालिकेने मानपत्र देऊन यथोचित सन्मान करावा असे प्रस्तावात नमूद करणार आहे.''

मानपत्रासंदर्भात आम्ही गंभीर आहोत. सत्ताधाऱ्यांसारखा वेंधळेपणा करणार नाही. रितसर प्रस्ताव दाखल केला जाईल. मानपत्र का द्यावे याबाबत सभागृहात चर्चा करणार. सभागृहाने एकमताने ठराव केल्यावर त्याची अंमलबजावणी महापालिकेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होईल याचे नियोजन केले जाईल.
- रियाज खरादी, नगरसेवक

Web Title: solapur news mim asaduddin owaisi solapur municipal