आष्टी तलावातील पाणीसाठा झाला कमी...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 मार्च 2018

मोहोळ (सोलापूर): आष्टी तलावातील पाणीसाठा अत्यंत कमी झाला असून, या तलावावर 12 गावांच्या पाणी पुरवठा योजना अवलंबून आहेत. येत्या रोटेशन मध्ये 600 क्यूसेस व पुढच्या रोटेशन मध्ये 500 क्यूसेस पाणी सोडावे, अशी मागणी अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे यांनी पालकमंत्र्यांकड़े केली असून पालक मंत्र्यांनी संबंधित विभागाला तसे आदेश दिले असल्याची माहिती डोंगरे यांनी दिली.

सध्या आष्टी तलावावर बारा गावांच्या पाणी पुरवठा योजना अवलंबून आहेत. सध्या तलावातील साठा अंत्यंत कमी झाला आहे, त्यामुळे 12 गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवु शकतो. तसेच या तलावावर पापरी, आष्टी, शेटफळ, खंडाळी, देवडी आदि गावातील शेतकऱ्यांचे  सुमारे 2200 एकर बागायत आहे. त्यात द्राक्ष, डाळिंब या फळबागासह अन्य उन्हाळी पिकांचा समावेश आहे.

सध्या कड़क उन पडत आहे. फळ बागा या फळ धारनेच्या अवस्थेत आहेत. पाणी नाही सोडल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुक्सान होणार आहे. तसेच हा विषय दोन दिवसांपूर्वी झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत समाविष्ट करावा, अशीही मागणी डोंगरे यांनी केली आहे.

Web Title: solapur news mohol aasti talaw water farmer vijayraj dongre