मोहोळ येथे स्वतंत्र बस आगाराच्या जागेची पाहणी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 मार्च 2018

मोहोळ (सोलापूर): महिन्यापुर्वी मोहोळचे नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी मोहोळला स्वतंत्र बस आगार असावा, अशी मागणी केली होती त्या अनुशंगाने आज (सोमवार) मोहोळ येथे महाराष्ट्रा राज्य परिवहन महामंडळाचे सोलापूर जिल्हयाचे जिल्हा नियंत्रक रमाकांत गायकवाड हे डेपोसाठी जागा पाहणी करण्यासाठी आले होते.

रमाकांत गायकवाड यांनी मोहोळ येथे स्वतंत्र बस आगाराच्या जागेची पाहणी केली. यामुळे मोहोळ येथे लवकरच स्वतंत्र्य बस आगार होणार आहे. यामध्ये किमान नविन 350 युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. येथून जास्तीच्या  बस उपलब्ध होणार आहेत. त्याच्या बरोबर कामगारा राहण्यासाठी कामगार वसाहत ही निर्माण होणार असून, त्याचा बरोबर डिजेल पंप देखील उभारला जाणार आहे. या स्वतंत्र्य बस आगारामुळे मोहोळ शहराच्या विकासात भर पडणार असून, याचा शहर व तालुक्यातील जनतेला याचा मोठा फायदा होणार असल्याचे नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी सांगितले.

यावेळी उपनगराध्यक्ष शौकतभई तलफदार, अरूण मांडवे आदी उपस्थित होते.

Web Title: solapur news mohol new st bus stand