अखेर हाती लागला खून करणारा दरोडेखोर बप्पा!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

मोहोळमध्ये केला होता पोलिसावर हल्ला, मदत करणाऱ्याचा खून

सोलापूर: दरोड्याच्या गुन्ह्यात पोलिसांच्या तावडीतून निसटून जाताना पोलिस पथकावर हल्ला करून पोलिसांना मदत करणाऱ्या अबू कुरेशी याचा धारदार शस्त्राने खून केल्याप्रकरणात छगन ऊर्फ बप्पा गंगाराम शिंदे (वय 28, रा. जामगाव खुर्द ता. मोहोळ) हा स्थानिक गुन्हे शाखेच्या हाती लागला आहे. गंगाखेड (ता. परभणी) येथे उसाच्या शेतात पाठलाग त्याला अटक करण्यात आली आहे.

मंगळवेढा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खून आणि दरोड्याच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी वैजिनाथ रामा भोसले, छगन ऊर्फ बप्पा छगन गंगाराम शिंदे व सागर हे सर्वजण मोहोळ येथील नरखेड फाटा परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 13 फेब्रुवारी रोजी सापळा लावला होता. वैजनाथ आणि त्याचे साथीदार नरखेड फाटा येथून दुचाकीवरून जाताना पोलिसांना दिसले. पोलिसांनी पाठलाग करून मोहोळमधील शिवाजी चौकात वैजिनाथ यास अडवून ताब्यात घेतले. वैजिनाथ व त्याच्या दोघा साथीदारांनी पोलिस कर्मचारी रामनाथ बोंबीलवार यांच्या डाव्या दंडावर व सचिन मागाडे यांच्या पाठीवर चाकूने वार करून जखमी केले होते. त्यास पोलिसांनी मोठ्या धाडसाने जागेवरच पकडले होते. पळून जाणाऱ्या आरोपीपैकी छगन याने गुलशन नगर भागात अबू कुरेशी याच्यावर धारदार शस्त्राने वार करून खून केला होता. याबाबत मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गंगाखेड परिसरात उसाच्या शेतात पाठलाग करून अटक करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू, अपर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजय कुंभार यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक हेमंत भंगाळे, रियाज शेख, पोलिस कर्मचारी नारायण गोलेकर, विजयकुमार भरले, गोरक्षनाथ गांगुर्डे, रवी माने, अरुण केंद्रे, सागर शिंदे, सचिन गायकवाड, बाळू चमके, राहुल सुरवसे, आनंद दिघे यांनी ही कामगिरी केली आहे.

Web Title: solapur news mohol police robber arrested