मोहोळ तालुक्यातील चौदा शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहिर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 मार्च 2018

मोहोळ (सोलापूर): मोहोळ तालुक्यातील विविध शाळामधील चौदा शिक्षकांना तालुका स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहिर झाले असून, येत्या बावीस मार्च रोजी मोहोळ येथे तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद व तालुका पंचायत समिती सदस्यांच्या हस्ते त्याचे वितरण होणार असल्याची माहिती गट शिक्षणाधिकारी मारूती फडके यांनी दिली.

मोहोळ (सोलापूर): मोहोळ तालुक्यातील विविध शाळामधील चौदा शिक्षकांना तालुका स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहिर झाले असून, येत्या बावीस मार्च रोजी मोहोळ येथे तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद व तालुका पंचायत समिती सदस्यांच्या हस्ते त्याचे वितरण होणार असल्याची माहिती गट शिक्षणाधिकारी मारूती फडके यांनी दिली.

या संदर्भात अधिक माहिती देताना फडके म्हणाले, शिक्षण विभागाने पुरस्कारासाठी वेगवेगळे निकष लावले होते त्यात समाविष्ट होणाऱ्या शिक्षकांचे प्रस्ताव पुरस्कारा साठी पाठविले होते निकषात शंभर टक्के गुणवत्ता सामाजिक कार्यात सहभाग शाळा आय एस ओ ज्ञान रचनावाद मुलांचा स्पर्धा परिक्षेतील सहभाग याचा समावेश आहे, तसेच शासनाने मध्यंतरी दिपसंभ परिक्षा घेतली होती त्यात ही चौघांनी यश प्राप्त केले आहे.

तालुकास्तर आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी पुढील प्रमाणे

 • श्रीमती शितल सोमवंशी (मोहोळ)
 • रूपेश क्षीरसागर (नजीक पिंपरी)
 • श्रीमती रोहिनी देशपांडे (पेनुर)
 • रवि चव्हाण (खंडाळी)
 • श्रीमती दिपाली नकाते (अनगर)
 • प्रकाश थोरबोले (देवडी)
 • श्रीमती शरयु थोरात (नरखेड)
 • निजामुद्धीन आतार (पांडवनगर)
 • मल्लीनाथ मलाबदे (अर्जुन सोंड)
 • ईश्वर वाघमोडे (काकडे वस्ती)
 • चंद्रकांत सुतार (दादपुर)
 • नागराज यावगल (जामगाव  बु॥)
 • सचिन शिन्दे (दादपुर)
 • श्रीमती नंदा  नरूटे (केंद्रप्रमुख नरखेड)

दिपस्तंभ परिक्षा यशस्वी शिक्षक

 • श्रीमती मनिषा वसेकर (आष्टी)
 • श्रीमती शितल सोमवंशी (मोहोळ)
 • राजकुमार वसेकर (खंडाळी)
 • अश्पाक शेख (मोहोळ)

जिल्हास्तर आदर्श शिक्षक

 • हरिश्चंद्र राऊत (मोहोळ)
 • नागेश येवले (वटवटे)
 • भास्कर थोरात (पापरी)
 • श्रीमती विजया गावडे (सारोळे)

क्रीडास्पर्धा  संचलन सहभागी शाळा

 • जिल्हा परिषद शाळा सय्यद वरवडे
 • जिल्हा परिषद शाळा दतनगर
 • जिल्हा परिषद शाळा गुलशन नगर

यशस्वी शिक्षकामधे आठ महिला शिक्षिका आहेत

Web Title: solapur news mohol taluka teacher award