सोलापूर महापालिका पोटनिवडणुकीत जागा एक; इच्छुक अनेक 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 मार्च 2018

शिवसेनेकडून ढगे, साठे 
भाजपचे माजी नगरसेवक बापू ढगे यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्याच वेळी गंगाधर साठे यांनीही उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळे उमेदवारी मिळवण्यात ढगे यशस्वी होतात की साठे, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

सोलापूर : महापालिका पोटनिवडणुकीत एकच जागा आहे, मात्र त्यासाठी प्रमुख पक्षांत अनेक इच्छुक आहेत. परिणामी, उमेदवार निश्‍चित करताना पक्षश्रेष्ठींना डोकेदुखी होणार आहे. 

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून प्रत्येकी एकाच उमेदवाराने अर्ज दाखल केला असल्याने त्या पक्षांत रस्सीखेच नाही. मात्र या प्रभागात प्रभाव असलेल्या एमआयएम आणि भाजपमध्ये मात्र रस्सीखेच होणार आहे. एमआयएम आणि भाजपकडून प्रत्येकी तीनजण इच्छुक आहेत. त्यामुळे या पक्षांच्या नेत्यांचा कस लागणार आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे असलेले पीरअहमद शेख यांना एमआयएमने उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र याच पक्षाकडून अ. कादर बागनगरी आणि नसीम शेख यांनीही अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे उमेदवारी कोणाच्या पारड्यात पडते आणि कोण बंडखोरी करतो, हे माघारीच्या दिवशीच स्पष्ट होईल. अशीच स्थिती भाजपमध्ये आहे. मूळ कॉंग्रेसमध्ये असलेले रणजित दवेवाले यांना भाजपने संधी दिली आहे. तरीसुद्धा ज्ञानेश्‍वर अंजिखाने व उपेंद्र दासरी यांनीही उमेदवारीवर दावा केला आहे. दासरी यांनी 2017 ची निवडणूक याच प्रभागातून लढविली होती. 

शिवसेनेकडून ढगे, साठे 
भाजपचे माजी नगरसेवक बापू ढगे यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्याच वेळी गंगाधर साठे यांनीही उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळे उमेदवारी मिळवण्यात ढगे यशस्वी होतात की साठे, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

Web Title: Solapur news municipal corporation bypoll